महेश जाधव यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष महेश बाळासाहेब जाधव यांना आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. जाधव यांच्या निवडीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष महेश बाळासाहेब जाधव यांना मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. जाधव यांच्या निवडीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

जाधव हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. अनेकदा जिल्हाध्यक्ष पदाचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या निवडीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत महेश जाधव यांचा भाजप कोल्हापूर महानगरच्या वतीने भव्य नगारी सत्कार आयोजित करण्यात येणार आहे.

पंढरपूर व शिर्डी देवस्थान समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. याच धर्तीवर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांना दर्जा दिला आहे. भविष्यात देवस्थान समितीच्या प्रत्येक अध्यक्षाला हा दर्जा मिळणार आहे.   
- चंद्रकांत पाटील,
महसूलमंत्री

देवस्थान समितीच्या माध्यमातून अंबाबाई मंदिर सामाजिक समतेचे मंदिर बनवण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने भाजपचा झेंडा फडकवत ठेवला. 
- महेश जाधव, 

अध्यक्ष महाराष्ट्र देवस्थान समिती 

Web Title: Kolhapur News State Minister level post to Mahesh Jadav