पन्हाळगडावरील तीन दरवाजा रात्री बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

कोल्हापूर - पन्हाळ्यावरील ऐतिहासिक तीन दरवाजा आता रोज सायंकाळी सातनंतर सरकारी दरवाजामुळे बंद राहणार आहे. या वास्तूच्या ऐतिहासिक स्वरूपाला बाधा येणार नाही, अशा पद्धतीने हा नवा दरवाजा बसविण्यात येईल. जेणेकरून तीन दरवाजातून होणारी बेकायदेशीर वाहतूक बंद राहणार आहे. अर्थात, एका छोट्या दरवाजातून स्थानिक लोकांना ये-जा करता येईल.

तीन दरवाजातून एक जुना मार्ग आहे. त्यावरून लोकांना ये-जा करता येते; पण काही जणांनी याच मार्गावरून चारचाकी वाहने, ट्रॅक्‍टर आणण्यास सुरवात केल्याने ऐतिहासिक वास्तूचे महत्त्वच 
हरवले आहे. 

केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे संवर्धक विजय चव्हाण यांनी सांगितले, की तीन दरवाजा ही पन्हाळगडावरील अतिशय देखणी व ऐतिहासिक वास्तू आहे. त्याची जपणूक होणे आवश्‍यक आहे. या तीन दरवाजातून पायवाट आहे. गेल्या काही वर्षांत तेथून चारचाकी 
वाहनांची ये-जा सुरू आहे. ऐतिहासिक वास्तू संरक्षणाच्यादृष्टीने वाहतूक बंद ठेवण्यासाठी रात्री फाटक लावून हा दरवाजा बंद ठेवण्यात येणार आहे. दिवसाही मोठी वाहने तीन दरवाजांतून जाऊ नयेत, अशी व्यवस्था केली जाईल.

Web Title: Kolhapur News Teen Darawaja on Panhalgad