आवळीत आंदोलनामुळे कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग ठप्प

आवळीत आंदोलनामुळे  कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग ठप्प

देवाळे - कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर आवळीं (ता पन्हाळा) येथे विविध मागण्यांसह राष्ट्रीय महामार्ग भूसंपादित शेतकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे दोन तास महामार्ग ठप्प होऊन वाहतूक विस्कळीत झाली 

नियोजित नागपूर - रत्नागिरी (क्र 166) या राष्ट्रीय महामार्गाचे चाैपदरीकरण करण्यात येत आहे. महामार्गासाठी घेण्यात आलेल्या शेतजमिनीबाबत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याची ठोस माहिती जिल्हा कार्यालयाकडून देण्यात येत नाही. पिडीतांना मिळणारा मोबदला व नुकसान भरपाई योग्य मिळावी, या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शासन विरोधात घोषणाबाजी करून आंदोलकांनी निषेध व्यक्त करण्यात आला. सुमार दोन तास झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या - 

  • भूसंपादित शेतकऱ्यांना प्रतिगुंठा पाच लाख 
  • आरसीसी बिल्डींग करिता तीन हजार प्रति स्केअर फुट
  • लोड बेरिंग व दगड मातीच्या इमारतीसाठी पंचवीसशे रुपये प्रति स्क्वेअर फुट
  • तसेच इमारतीच्या जागेच्या किंमतीसह मोबदला
  • विहिरीसाठी चार लाख, बोअरसाठी साठ हजार,
  • फळबागेतील प्रति झाड एक लाख 

संबंधीत मागण्यांचे निवेदन पन्हाळ्याचे तहसीलदार एस. एम. जोशी, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर कार्यालयाचे भुमिअभिलेख उपाधीक्षक आर. डी. काटकर यांना देण्यात आले.

या मागण्याची पूर्तता न झाल्यास उपोषणास व आत्मदहन करण्याचा इशाराही मनसेचे जिल्हा उपध्यक्ष संजय पाटील यांनी यावेळी दिला आहे

मनसे पन्हाळा तालुकाध्यक्ष मोहन शेळके, शाहुवाडी तालुका अध्यक्ष कृष्णात दिंडे, विशाल मोरे, दीपक पाटील आदी उपस्थित होते यावेळी कोडोली पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com