
कोल्हापूर : मुद्रांक शुल्क भरा चार महिन्यांत नोंदणी
कोल्हापूर: मुद्रांक नोंदणी विभागात मार्चअखेरीस दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी आणि त्यामुळे सर्व्हर येणारा ताण (लोड) लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आज मुद्रांक शुल्क भरून चार महिन्यांत केव्हाही दस्तनोंदणी करण्याची योजना या विभागाने जाहीर केली आहे. जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी यासंदर्भातील आदेश आज काढले. या निर्णयाने दस्तनोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.
मुद्रांक शुल्क भरा; चार महिन्यांनी नोंदणी
मुद्रांक शुल्कातही वाढ होते. तत्पूर्वी, खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी संबंधितांची धांदल उडालेली असते. विशेषतः मार्चमध्ये अखेरीस या नोंदणीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारितीतील सर्वच कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत असते. एकाचवेळी अनेक दस्त राज्यभरातून शासनाच्या या वेबसाईटवर येत असल्याने या विभागाचा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खरेदी विक्रीशी संबंधितांना दिवसभर या कार्यालयात बसून रहावे लागते. सायंकाळी कधीतरी हा सर्व्हर सुरू होतो; पण तोपर्यंत पक्षकार निघून गेलेले असतात.
यावर मार्ग काढण्यासाठी जे मालमत्ताधारक ३१ मार्चपूर्वी दस्तावर खरेदीदार व विक्रेत्यांच्या सह्या करणे, शासकीय मुद्रांक भरणे ही प्रक्रिया पूर्ण करतील, अशांचे दस्त नोंदणीचे काम पुढील चार महिने करता येणार आहे. चार महिन्यांनंतर दस्त नोंदणी करताना जुन्या रेडीरेकनरप्रमाणेच ही नोंद करता येणार आहे. पक्षकारांच्या सोयीसाठी नोंदणीची वेळही रोज एक ते दोन तासांनी वाढवून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना या कार्यालयातील गर्दी टाळण्याचे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.
जिल्ह्यात मुद्रांक नोंदणी विभागातील सर्व्हर डाउन होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच वेळी जास्त संख्येने या सर्व्हरवर दस्त अपलोड केल्याने त्यावर ताण येऊन ही यंत्रणा बंद पडते. त्यातून पक्षकारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनाने ही नवी योजना जाहीर केली आहे. म्हणून लोकांनी आता गर्दी टाळावी.
- मल्लिकार्जुन माने, मुद्रांक जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी
Web Title: Kolhapur Stamp Department Pay Stamp Duty Register Four Months
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..