
कोल्हापूर : तरीही नालेसफाईचे सोपस्का
कोल्हापूर : ‘‘गेल्या वर्षी जेसीबीने गाळ काढून नाला खोल केला होता. यंदा मात्र फक्त जेसीबी नाल्यातून इकडून-तिकडे नेला,’’ अशी आजही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. नालेसफाईबाबत काही दिवसांपासून ओरड सुरू असताना प्रशासकांकडून कारवाई केली जात असतानाही वाय. पी. पोवारनगरमध्ये आज अशा पद्धतीने काम सुरू होते. तसेच, यल्लम्मा मंदिराजवळील पुलाजवळ नाल्यात कोसळलेली दोन झाडे अजूनही काढली गेलेली नाहीत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी झालेल्या दोन वेळा पावसाने महापालिकेने नालेसफाईचे सोपस्कार दाखवून दिले. नाल्यांबरोबरच रस्त्यावरील पाणी वाहून नेणाऱ्या गटारी साफ केलेल्या नाहीत, हे दिसले. त्यानंतर प्रशासकांनी रस्त्यावर उतरून मुख्य आरोग्य निरीक्षकांकडून झालेल्या दुर्लक्षाची झाडाझडती घेतली. त्यानंतर सफाईला वेग आल्याचे दिसून आले; पण त्याची गती राहिली नाही. यल्लम्मा मंदिराजवळील नाल्यात अगदी रस्त्यालगत दोन झाडे उन्मळून पडली आहेत. दोन आठवड्यांपूर्वीची ती असतानाही अजून ती ‘जैसे थे’ आहेत.
वाय. पी. पोवारनगर ते हुतात्मा गार्डनपर्यंतच्या टापूत आज जेसीबी काम करीत होता. हुतात्मा गार्डनच्या पुलावरील एका बाजूकडील गाळ काढून रस्त्यावर टाकला आहे. दुसऱ्या बाजूकडील स्थिती ‘जैसे थे’ होती. तसेच, तिथे एक नाल्यात जवळपास दहा फूट आत आलेले बांधकाम रस्त्यावरूनही स्पष्ट दिसते. तिथून वाय. पी. पोवारनगरमधील नाल्याची वरवरच सफाई झाली आहे. तेथील नागरिकांच्या मते यंदा केवळ सोपस्कार झाले आहेत. सफाई केल्याचे दाखविण्यासाठी असे काम केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
Web Title: कोल्हापूर तरीही नालेसफाईचे
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..