esakal | ब्रेकिंग : कोल्हापुरात उद्यापासून 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

बोलून बातमी शोधा

Lockdown

गेल्या 15 एप्रिल पासून जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊन आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

ब्रेकिंग : कोल्हापुरात उद्यापासून 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या आणि ऑक्सिजनवर असणारे पेशंटची संख्या पाहता उद्यापासून जिल्ह्यात दहा दिवस परत लाॅकडाऊन (10 Days Lockdown in kolhapur) करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज सकाळी बैठकीत घेण्यात आला. (Kolhapur will have a 10 days lockdown from Wednesday)

गेल्या 15 एप्रिल पासून जिल्ह्यामध्ये लाॅकडाऊन आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. उद्या दुपारी अकरानंतर याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. (Food and Milk Open) केवळ दूध आणि भाजीपाला सुरू राहील.

जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता यामुळे आज सकाळी 10 वा. व्हिडीओ काॅन्सरन्सच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे . व्हिडीओ काॅन्सरन्समध्ये सहभागी झाले होते.

पाटील  म्हणाले, जिल्ह्यामध्ये सद्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा.

हेही वाचा- Gokul Election: उत्कंठा वाढवणाऱ्या लढतीत शौमिका महाडिकांची बाजी तर विरोधी गटातून रेडेकर विजयी

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलीसांनी त्याची अंमलबजावणी करावी.आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले,  लसीकरणासाठी येणारऱ्या नागरिकांना सूट देवून लॉकडाऊन कडकडीत करावा.

जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी  पॉझिटिव्ह दर कमी नाही. जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. उद्या बुधवार दि. 5 मे सकाळी 11 पासून जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

(Kolhapur will have a 10 days lockdown from Wednesday)