Kolhapur : महाडिक गटाला मोठा दणका; राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्र, शौमिका महाडिकांसह कुटुंबातील दहा जणांचा समावेश

शेवटी सत्य जगासमोर आले असल्याचाही दावा सतेज पाटील यांनी केला.
Shoumika Mahadik vs Satej Patil
Shoumika Mahadik vs Satej Patil esakal
Summary

महाडिक यांनी सगळं खोटं केले आहे. आता आम्ही गप्प बसलो, तर प्रामाणिक सभासद आणि ऊस उत्पादकांवर अन्याय केल्यासारखा होईल.

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे (Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory) पूर्वी अपात्र ठरलेल्या १३४६ पैकी १२७२ सभासद प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी अपात्र ठरवले आहेत.

Shoumika Mahadik vs Satej Patil
Maratha Reservation : 'मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, OBC आरक्षणातील घुसखोरी आम्ही कदापि सहन करणार नाही'

कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील गावातील सभासद, ताबेगहाण खतानुसार शेती क्षेत्र धारण असलेले सभासद, किमान शेती क्षेत्र नसतानाही सभासद केले आदी कारणांमुळे ते अपात्र ठरले आहेत. त्यात गोकुळ संचालिका शौमिका महाडिक व सौ. ग्रीष्मा स्वरूप महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील १० जणांचा समावेश असल्याची माहिती आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

Shoumika Mahadik vs Satej Patil
इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय! 'हाल-शुगर'वर जोल्ले दाम्पत्याचा दबदबा; कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर

ते म्हणाले, ‘‘राजाराम कारखान्यात येलूर (ता. वाळवा, जि. सांगली) सह इतर ठिकाणाचे बनावट सभासद केले. घरचे सभासदही बनावट केले आहेत. महाडिक हे राजाराम कारखाना सभासदांचा म्हणत होते. आता कोणत्या सभासदांचा म्हणत होते, हे लक्षात आले आहे. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांची मते आम्हालाच मिळाली आहेत, हे आता सिद्ध झाले आहे.’’ ज्याची शेती नाही, ऊस नाही, सातबारा नाही अशा अपात्र सभासदांमुळे महाडिक यांच्याकडे सत्ता गेली, असा आरोपही त्यांनी केला.

सतेज पाटील म्हणाले, ‘‘राजाराम कारखान्याच्या १२ हजार सभासदांपैकी ११ हजार सभासदांनी मतदान केले आहे. यामध्ये ५००० ते ५५०० हजार मते आमच्या पॅनेलला मिळाली आहेत. महाडिक यांच्या पॅनेलला ६००० ते ६३०० च्या दरम्यान मते मिळाली. यात १२७२ अपात्र सभासदांचे मतदान आहे. महाडिक यांना ११७२ ते १५०० मतांची आघाडी मिळाली आहे. यातून अपात्र सभासद वगळले असते, तर हे चित्र वेगळे असते.’’

Shoumika Mahadik vs Satej Patil
Pankaja Munde : मराठा आरक्षण न टिकवण्यासाठी 'ही' समितीचं जबाबदार; पंकजा मुंडेंचा थेट आरोप

सौ. शौमिका अमल महाडिक आणि सौ. ग्रीष्मा स्वरूप महाडिक यांनी राजाराम कारखान्याकडे शिये (ता. करवीर) असा पत्ता नोंदवला आहे. तर, ओमवीर महाडिक, ब्रिजगुप्त महाडिक, शंकरराव महाडिक, साधना महाडिक, माई भीमराव महाडिक, दीपाली महाडिक, मनीषा महाडिक व रेश्‍मा महाडिक यांनी सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथील पत्ता नोंद केला आहे, असे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी सांगितले.

शेवटी सत्य जगासमोर

साखर सहसंचालकांनी ते सभासद अपात्र ठरवले होते. त्यानंतर ते सभासद सहकार मंत्री, उच्च न्यायालयातही अपात्र ठरले होते. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर सरकारने याची फेरचौकशी करायची असल्याचे सांगितले होते. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

Shoumika Mahadik vs Satej Patil
मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण दिल्यास OBC समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही; काँग्रेस नेत्याचा स्पष्ट इशारा

सर्वोच्च न्यायालयाने याची फेरचौकशी करावी म्हणून आदेश दिले. दरम्यान, ज्या दिवशी निकाल जाहीर झाला, त्यादिवशीही हे सभासद अपात्र असल्याचे सांगितले होते. याच अपात्र सभासदांच्या जोरावर त्यांना निवडणूक करावयाची होती. त्याचाच फायदा महाडिक यांना झाला. शेवटी सत्य जगासमोर आले असल्याचाही दावा सतेज पाटील यांनी केला.

दाखल याचिकेला निकाल जोडू

निवडणूक याचिका यापूर्वीच दाखल केली आहे. आजच्या निकालाची आम्ही वाट पाहत होतो. निवडणूक याचिका मुदतीत दाखल करावी लागते. ती केलेली आहे. आता हा निकाल पुरवणी म्हणून जोडला जाईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.

Shoumika Mahadik vs Satej Patil
देशात मतदान प्रक्रिया पारदर्शकच, कोणत्याही वायरलेस यंत्रणेनं EVM मशिन हॅक करणं अशक्य; मुख्य निवडणूक आयुक्तांचा मोठा खुलासा

फेरनिवडणुकीची मागणी करू

महाडिक यांनी सगळं खोटं केले आहे. आता आम्ही गप्प बसलो, तर प्रामाणिक सभासद आणि ऊस उत्पादकांवर अन्याय केल्यासारखा होईल. त्यामुळे पुढची लढाई निश्‍चित लढली जाईल. बनावट सभासदांच्या माध्यमातून निवडणूक जिंकली असली तरी फेरनिवडणुकीबद्दल मागणी केली जाईल, असे पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com