Kolhapur : जिल्ह्यात ५ लाख लोकांचे लसीकरण बाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

जिल्ह्यात ५ लाख लोकांचे लसीकरण बाकी

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे, मात्र अखेरच्या टप्‍प्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. अजूनही सुमारे ५ लाख लोकांचे लसीकरण होणे बाकी आहे. येत्या २० नोव्‍हेंबरपर्यंत हे लसीकरण करण्याचे उद्दिष्‍ट ठेवले आहे. यात ज्‍येष्‍ठांचे घरी जाऊन लसीकरण करणे, कॅम्‍प आयोजित करणे यासह प्रोत्‍साहन योजना जाहीर करून लसीकरण वाढवणे, असे उपक्रम घेण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून सुरू आहे.

जिल्‍ह्यात आजअखेर २५ लाख लोकांनी लस घेतली आहे. कोरोना जेव्‍हा उच्‍च पातळीवर होता, रुग्‍णसंख्येचा आलेख वाढतच चालला होता. तेव्‍हा लोकांनी रांगा लावून कोरोनाची लस घेतली. रात्रीच्या रांगाही लावल्या. लस मिळत नसल्याने अनेक लसीकरण केंद्रावर वादावादी झाली, मात्र कोरोनाचे रुग्‍ण कमी होत जाईल, तसे लसीकरणाकडे दुर्लक्ष झाले. ग्रामपंचायती असतील किंवा स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍था यांनी लसीकरणातून अंग काढून घेतले. एका बाजूला लसीकरणास स्‍थानिक पातळीवर प्रतिसाद मिळत नसताना शासनाकडून मात्र लसीकरणासाठी जोर लावला जात आहे. जिल्‍हा प्रशासन लसीकरण वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या युक्‍त्या करत आहे.

लसीकरण वाढवण्यासाठी दररोज आढावा सुरू आहे. लोकांचे प्रबोधन सुरू आहे. आशा दररोज भेटी करून लसीकरणासाठी लोकांना आवाहन करत आहेत. ज्‍येष्‍ठ नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे. २० नोव्‍हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार आहोत.

- डॉ. फारुख देसाई, लसीकरणप्रमुख.

loading image
go to top