Police Transfer : पाचशे पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काढले आदेश

पोलिस मुख्यालय तसेच पोलिस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील पाचशे पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज काढले.
police
police esakal

कोल्हापूर - पोलिस मुख्यालय तसेच पोलिस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील पाचशे पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज काढले. याची यादी जाहीर करण्यात आली असून, बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश अधीक्षक पंडित यांनी दिले आहेत. दरम्यान, यावेळी पहिल्यांदाच बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून पाच पर्याय मागविण्यात आले होते.

पोलिस मुख्यालय तसेच पोलिस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात होते. परंतु, मे महिन्यात लोकसभा निवडणूक असल्याने या बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे या बदल्यांची प्रक्रिया आता करण्यात आली.

यावेळी बदलीस पात्र प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याकडून इच्छित पाच ठिकाणांच्या पर्यायाची नावे टाकून अर्ज मागविले होते. त्यानुसार सोमवारी (ता. १) बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सहायक फौजदार ६५, पोलिस हवालदार १७१, पोलिस नाईक ६३, पोलिस शिपाई २०१ अशा पाचशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

विनंती बदल्यांची प्रक्रिया तीन ते चार दिवसांनंतर सुरू होणार आहे. यात पती-पत्नी दोघेही पोलिस कर्मचारी असणे, तसेच आई-वडिलांचे आजारपण अशा कारणांसाठी कर्मचाऱ्यांकडून विनंती बदल्यांचे अर्ज केले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com