54 वा ‘इंजिनीअर्स डे‘ साजरा, विविध पदाधिकाऱ्यांनी मांडली मते

आर्किटेक्टस असोसिएशनतर्फे महापूराच्या कारण, उपायांसाठी अभ्यास गट
54th Engineers' Day
54th Engineers' Daysakal
Updated on

कोल्हापूर: असोसिएशन ऑफ़ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्सच्या वतीने असोसिएशनचे कार्यालयात आज मोक्षगुंडम विश्वेसरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 54 वा अभियंता दिन साजरा करण्यात आला. अभियंता दिनानिमित्त महापुराचे कारण, उपायांसाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली.

54th Engineers' Day
गडहिंग्लज : तेवीस हजार गणेश मूर्तींचे पर्यायी व्यवस्थेत विसर्जन

महिन्यापूर्वी झालेल्या असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अभ्यासगट स्थापन करण्याची सुचना केली होती. त्यानुसार हा गट स्थापन करण्यात येवून त्याची पहिली बैठक अभियंता दिनानिमित्त घेण्यात आली.

बैठकीत असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी अभ्यास गट स्थापण करण्याचे उदीष्ट स्पष्ट करताना कोल्हापूर शहर व जिल्हा परिसरातील महापुराचे पाण्याची पातळी वाढू नये व पाणी जलदगतीने पूढे वाहुन जावे, याकरिता सर्वानी आपली मते नोंदवावीत, असे आवाहन केले. त्यानूसार उपस्थीत विविध संस्था व विभाग प्रतिनिधिनी आपली मते प्रदर्शित केली. यापुढे आणखी कांही संबंधित संस्था व विभाग यांचा सहभाग वाढवून बैठका घेऊन एक अंतिम अहवाल असोसिएशनचे वतीने शासनास सदर करण्यात येणार असल्याचेही कोराणे यांनी जाहीर केले.

आजच्या बैठकीत शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभाग प्रमुख सचिन पन्हाळकर, प्राधिकरण मुख्यकार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण, महापालिका तिसरा विकास आराखडा यूनिटचे नगररचना उपसंचालक धनंजय खोत, पाटबंधारे विभाग अधिकारी मनोज पारकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनाईक व उप- शहर अभियंता हर्षजीत घाटगे, के.आय.टी.चे सिव्हिल विभाग प्रमुख मोहन चव्हाण, प्रा.शितल वरुर, डी.वाय, पाटील इंजिनीअरींग कॉलेजचे आय.क्यु.ए.सी. अधिष्ठाता मिलिंद पाटील व सीव्हील विभाग प्रमुख अभय जोशी, न्यू पॉलिटेकनिकचे प्राचार्य विनय शिंदे, प्रा. संदीप घाटगे उपस्थित होते. यावेळी असोसिएशच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com