kolhapur : बदलते तंत्रज्ञान स्वीकाराच; पण दक्षताही बाळगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur
कोल्हापूर: बदलते तंत्रज्ञान स्वीकाराच; पण दक्षताही बाळगा.

बदलते तंत्रज्ञान स्वीकाराच; पण दक्षताही बाळगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: ‘‘माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने होत असलेले बदल या धावत्या जगात स्वीकारावेच लागतील. परंतु; हे बदल स्वीकारतानाच सावधगिरी बाळगा, दक्षताही घ्या’’, असे प्रतिपादन सायबर कॉलेजच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे डॉ. प्रा. एस. डी  भोईटे यांनी केले.
६८ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त केडीसीसी बँक व कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डातर्फे या व्याख्यानाचे आयोजन झाले. अध्यक्षस्थानी बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल पाटील होते.

डॉ. भोईटे म्हणाले, ‘‘बँकिंग क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या क्षेत्रावर हॅकर्सचा डोळा आहे. या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गुन्हे होऊ नयेत, या ठी सातत्याने सजग राहिले पाहिजे. इंटरनेटद्वारे समाज माध्यमांचा वापर करीत असताना सुरक्षितता पाहिली जात नाही. त्यामुळे; माहिती चोरली जाऊन तिच्या आधारे सायबर गुन्हे होत आहेत. सायबर गुन्हेगारांना प्रथमदर्शनी पैशापेक्षा माहिती अधिक महत्त्वाची असते. कारण, नंतर त्या माहितीचा वापर करूनच मोठ- मोठे आर्थिक घोटाळे घडत आहेत. कॉसमॉस बँक, स्टेट बँक ऑफ मॉरिशस ही त्याचीच उदाहरणे आहेत.’’


बँकेचे संचालक आर. के. पोवार, तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा. एस. टी. जाधव, जिल्हा सहकार विकास अधिकारी एस. एस. देसाई, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक गोरख शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, स्वाती कुंभार, उपव्यवस्थापक आर. डी. सावंत उपस्थित होते.

loading image
go to top