esakal | कराडजवळ झालेल्या अपघातात भेंडवडेचे दोघे जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

कराडजवळ झालेल्या अपघातात भेंडवडेचे दोघे जागीच ठार

कराडजवळ झालेल्या अपघातात भेंडवडेचे दोघे जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पेठ वडगाव (कोल्हापूर) : कराड तालुक्यातील उंडाळे येथे कराड- रत्नागिरी महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकीखाली कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. मृत हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील आहेत. पूल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता व्यवस्थित न अडवल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे, कराड - रत्नागिरी महामार्गावर कराड तालुक्यातील उंडाळे गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे. रविवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे येथील पुनर्वसित वसाहतीत राहणारे जाणू भैरु झोरे, कोंडीबा भागोजी पाटणे आणि दगडू बिरू झोरे हे तिघेजण यामार्गे दुचाकीवरून ट्रीपल सीट भेंडवडेकडे जात होते. यावेळी नेहमीच्याच रस्त्याने जात असताना पुलाचे बांधकाम सुरू आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे दुचाकी थेट पुलात कोसळली. या अपघातात जाणू भैरु झोरे, कोंडीबा भागोजी पाटणे हे दोघे जागीच ठार झाले तर दगडू बिरू झोरे हे गंभीर जखमी झाले. रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह आणि दुचाकी कराड ग्रामीण पोलिसांनी बाहेर काढले.