
नागाव (कोल्हापूर) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नागावमधील (Nagaon)आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व सोळा हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. हणमंता भिमसी धोत्रे ( वय २७, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, नागाव, ता. हातकणंगले, जि . कोल्हापूर ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सह जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांनी आरोपीस दोषी ठरवून कलम ४५२ खाली दोन वर्षे सक्तमजूरी व ५ हजार रुपये दंड, कलम ३२३ खाली एक वर्ष सक्तमजूरी व १ हजार रुपये दंड, ५०४ खाली एक वर्ष सक्तमजूरी व ५ हजार रुपये दंड, तसेच लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व कलम ३५४ प्रमाणे तीन वर्ष सक्तमजूरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड अमिता ए. कुलकर्णी विशेष सरकारी वकील, कोल्हापूर यांनी काम पाहीले . शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महीला पोलीस उपनिरीक्षक एम. टी. गभाले यांनी याप्रकरणाचा तपास केला होता.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी :
सदर गुन्हा शिरोली एमआयडीसी या पोलीस ठाणेच्या हद्दीत ३१ जुलै २०१७ रोजी सायंकाळी घडला आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी ही तिच्या मैत्रीणी सोबत तिच्या राहत्या घरात एकत्र अभ्यास करीत असताना तिला अचानक दरवाजा वाजविल्याचा आवाज आला. त्यामुळे पिडीतेने खिडकीतून डोकावून पाहीले. त्यावेळी तिथे कोणीही नव्हते.
दरम्यान अचानक आरोपी घराचा दरवाजा ढकलून घरात घूसला, व त्याने आतील लाईट व फॅन बंद केले. पिडीत मुलीचा हात पकडून तिला आत ओढत नेत असताना यातील फिर्यादी पिडीत मुलीने शेजारी टेबलावरील कुलूप त्याच्या डोक्यात मारले व त्याला ढकलून देऊन घराला बाहेरुन कुलूप लावले. तशीच ती मैत्रिणीसोबत आईला बोलविण्या करीता आजी आजोबांच्या घराकडे गेली. आई घरी आलेनंतर त्याला घरी येण्याचे कारण विचारताच धोत्रेने मुलीच्या आईला शिवीगाळ करुन तिच्या थोबाडीत मारली. या कारणावरुन आरोपीविरुध्द यातील पिडीतेने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केली . शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक के. आर. भोसले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.