'आग्रा-राजगड-पारगड' शिवज्योतीचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'आग्रा-राजगड-पारगड' शिवज्योतीचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

चार राज्यांतून प्रवास करत शिवज्योत राजगड, सातारा, कराड, पेठ नाका, इस्लामपूर, पुलाची शिरोलीमार्गे आज कोल्हापुरात आली.

'आग्रा-राजगड-पारगड' शिवज्योतीचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषात 'आग्रा ते राजगड ते पारगड' शिवज्योतीचे रणरागिणी ताराबाई चौक येथे आज जल्लोषात स्वागत झाले. हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनतर्फे स्वागत करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. त्यातून ते सहीसलामत सुटून राजगडला पोचले. या घटनेला यंदा ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात, या उद्देशाने शिवज्योत मोहिमेचे आयोजन केले आहे. आग्रा येथून १७ ऑगस्टला शिवज्योतीस सुरुवात झाली. चार राज्यांतून प्रवास करत शिवज्योत राजगड, सातारा, कराड, पेठ नाका, इस्लामपूर, पुलाची शिरोलीमार्गे आज कोल्हापुरात आली.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची भीती; कोल्हापूरकर काळजी घ्या!

योद्धा फाऊंडेशन कमांडो रेस्क्यू फोर्सच्या कमांडोंच्या संचलनात सूरज ढोली, कृष्णा भोसले, संकेत गायकवाड शिवज्योत घेऊन ताराराणी चौक येथे पोचले. ताराराणी यांच्या पुतळ्याजवळ गगनभेदी घोषणा दिल्यानंतर हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, विजय देवणे, राहुल चिकोडे, किशोर पडवळ, ऋषीकेश केसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर व्हीनस कॉर्नर येथील राजाराम महाराज व दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवज्योतीचे स्वागत झाले.

दरम्यान, उद्या (३१) सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे पाच नद्यांच्या पाण्याच्या कलशासह जिल्ह्यातील विविध तालुके, गडकोट व ऐतिहासिक ठिकाणांना ज्योती रवाना होतील. मुख्य शिवज्योत कागल, निढोरी, मुरगूड, गारगोटी, भुदरगड किल्ला, उत्तूर, गडहिंग्लज, सामानगड, नेसरीखिंड, गंधर्वगड, चंदगड, कलानिधीगडमार्गे पारगडला पोचणार आहे.

हेही वाचा: थेट शिवसेना आमदाराला 'NCP'ची ऑफर

Web Title: Agra Rajgad Rajgad Road Way Flambeau Entry In Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur