कुडित्रे : विविध शत्रू कीटक, रासायनिक कीटकनाशके, जमिनीची यांत्रिक मशागत आणि पीक पद्धतीमुळे परागीभवनास व मधमाश्यांच्या वसाहतींना धोका निर्माण होत आहे. थाईसॅकब्रूड हा मधमाश्यांच्या वसाहतींना धोका निर्माण करणारा विषाणूजन्य रोग पसरला आहे. मधमाशी पालकांच्या माहितीनुसार ५० टक्के वसाहती अडचणीत आल्या आहेत.