तीन दरवाजावरची हवा खाऊन येतो की... 

 That the air on the three doors comes to eat
That the air on the three doors comes to eat

पन्हाळा : उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा. पर्यटकांविना पन्हाळा कधीच शक्‍य नाही. सगळयांच्याच मनात पन्हाळा ठसलेला. धुक्‍यात लपेटलेला.. पावसाने ओलाचिंब होणारा, थंड हवेच्या सुखद झुळका देणारा पन्हाळा तर पर्यटकांचं स्वप्न; पण याच पन्हाळ्याला या वर्षी ग्रहण लागलंय. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून रस्ता खचल्याने पन्हाळगड चार महिने बंद राहिला, तर कोरोनामुळे मार्चपासून जूनपर्यंत पुन्हा चार महिने गडाचे दरवाजे बंद झाले आहेत. 

लॉकडाउन सध्या थोडाफार शिथिल झाल्याने, तरुणाईच्या दुचाक्‍या, चारचाकी गडाकडे सरकू लागल्या आहेत; पण प्रवासीकर नाक्‍यावर बॅरिकेड्‌स लावून रस्ताच बंद केल्याने,"दादा, अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात परततो, तीन दरवाजावरची हवा चाखून लगेच परत येतो, इतरत्र कुठेही फिरत नाही. आजच्या दिवस सोडा..' अशी आर्जवे नाका कर्मचाऱ्यांसमोर केली जात आहेत; पण कर्मचारी हे हुकमाचे ताबेदार असल्याने ते ही विनंती मान्य करत नाहीत. साहजिकच ठरवून आलेले मनसुबे रद्द करत निराश मनाने या कर्मचाऱ्यांनाच दोषी ठरवत गाड्या परतीच्या मार्गाला लागत आहेत. 

मे अणि जून महिना तसेच सप्टेंबर ते डिसेंबर हा पर्यटकांचा खरा हंगामाचा काळ. मुलांच्या शाळेला सुट्या पडतात. त्यामुळे पुण्या मुंबईकडचे पर्यटक ठराविक हॉटेलांचे ऑनलाईन बुकिंग करतात नि मनसोक्‍त फिरत येथील नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेतात. मे महिन्यात थंड हवा चाखायला. जून महिन्यात पावसात भिजायला व धुक्‍यात हरवायला तर सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये गडावरचा आणि तटबंदीखालील हिरवागार, वेगवेगळ्या फुलांनी बहरलेला निसर्ग पहायला पर्यटक येत असतात. सर्वच बाबतीत पन्हाळा सर्वांच्याच खिशाला परवडणारा आणि ऐतिहासिक संदर्भासह सर्वच बाबतीत पर्यटकांना भुरळ घालणारे वातावरण असल्याने येथे वाहनांची रांग लागलेली असते. 

जूनचा पहिला आठवडा संपत आलाय. मध्यंतरी पाउस झाल्याने डोंगरदऱ्यांनी हिरवी शाल पांघरलीय. सकाळ संध्याकाळी धुक्‍याचे थर वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर अलगद पश्‍चिेमेकडे सरकताहेत. रानमेवा तयार झालाय. पक्ष्यांच्या मंजुळ आवाजाने परिसर भारलायं. अधूनमधून बिबट्याचे, गव्यांचे दर्शन घडतेय; पण पर्यटकांनाच यायला कोरोनाने मज्जाव केल्याने केवळ पन्हाळवासीयांनाच हे पहात बसावं लागलयं. पर्यटकांवर अवलंबून असणारे येथील गाईड, भेल, आईस्क्रिम, चहा भजी, झुणका भाकरचे हातगाडीवाले, हॉटेल, लॉजिंग, ऑर्डरप्रमाणे तांबडा पांढरा रस्सा करून देणारे खासगी व्यावसायिक कधी एकदा कोरोना टळतोय याची वाट पहात बसलेत. पन्हाळगड गेले चार महिने केवळ एकांतातच राहिलाय. कोरोना जाण्याची आणि पर्यटक येण्याची वाट पहात... 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com