esakal | अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला (sangli-kolhapur) ज्या धरणाच्या पाणी साठ्यामुळे पुराचा मोठा फटका बसतो. त्या अलमट्टी धरणातून (almatti dam) सध्या 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 2019 मध्ये अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे या धरणातून नियमितपणे पाणी विसर्ग व्हावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून (maharashtra government) तसेच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून होत राहिली. तरीही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्नाटक सरकार विरुद्ध महाराष्ट्र विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिक संताप व्यक्त करत राहिले. दरम्यान यावर्षी मात्र वेळेत पाणी विसर्ग करत कोल्हापूरसह सांगलीला दिलासा दिला आहे.

loading image