esakal | करवीर निवासिनी 'श्री अंबाबाई'ची इंद्राणी मातृका रुपात पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

करवीर निवासिनी 'श्री अंबाबाई'ची इंद्राणी मातृका रुपात पूजा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही हा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने होणार आहे.

करवीर निवासिनी 'श्री अंबाबाई'ची इंद्राणी मातृका रुपात पूजा

sakal_logo
By
- संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची इंद्राणी मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. उद्या (बुधवारी) देवीचा जागर असून श्री अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही हा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने होणार आहे.

हेही वाचा: 'अंबाबाई'ची वैष्णवी मातृका रुपात सालंकृत पुजा;पाहा व्हिडिओ

यंदाच्या उत्सवात सप्तमातृका संकल्पनेवर श्री अंबाबाई च्या पूजा बांधल्या जात आहेत. इंद्राणी मातृका देवांचा राजा इंद्राची शक्ती आहे. तिला महेंद्री किंवा वज्री असे म्हणतात. ती चतुर्भुज असून हत्तीवर आरूढ झाली आहे. तिच्या हातात वज्र, बोकड, पाश, कमळ आहे. विविध दागिन्यांनी ती सजली असून मुद्रा आक्रमक आहे, अशी माहिती श्रीपूजक सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर, विद्याधर मुनीश्वर यांनी दिली. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. उत्सवकाळात नियमांची अंमलबजावणी करावी. मात्र नियमांचा कुठलाही प्रकारचा अतिरेक नको, अशा सूचना प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: करवीर निवासनी 'श्री अंबाबाई' त्र्यंबोली देवीच्या भेटीला

loading image
go to top