पाच वाजून ५९ मिनिटांनी किरणे कासव चौकात आली. सहा वाजून २ मिनिटांनी किरणे पितळी उंबऱ्यातून आत आली. ६ वाजून ४ मिनिटांनी किरणांनी चांदीच्या उंबऱ्यातून गर्भकुटीत प्रवेश केला.
कोल्हापूर : मावळतीच्या सूर्यकिरणांनी रविवारी किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी अंबाबाईच्या (Ambabai Temple Kiranotsav Sohala) चरणांना स्पर्श केला आणि किरणोत्सवाचा सोहळा शेकडो भाविकांनी डोळ्यात साठवला. उत्तरायण किरणोत्सव सोहळ्याला बुधवारी (ता. २९) प्रारंभ झाला. पाच दिवसांच्या किरणोत्सव सोहळ्यात पहिल्या दोन दिवसांतच किरणांनी अंबाबाईला सोनसळी अभिषेक (Sonsali Abhishek) केल्याने यंदाचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला.