Kolhapur Ambabai Temple Navratri festival 2026
esakal
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दुपारच्या टप्प्यात दर्शनरांग काही काळ शेतकरी संघातही पोहोचली. पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलला होता. तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून आज (शुक्रवारी) देवीला मानाचा शालू अर्पण केला जाणार आहे. गुरुवारी सायंकाळीच हा शालू कोल्हापुरात आणण्यात आला (Lalita Panchami celebrations at Kolhapur Ambabai Temple) होता.