Bike-Car Accident : दुचाकी-कार अपघातात अंगणवाडी शिक्षिका ठार; डोक्याला जबर मार लागला अन् त्या खाली...
Bike-Car Accident : पती गोपाळ माळी व अंजना माळी या दुचाकीवरून आप्पाचीवाडीहून महामार्गाकडे येत होते. येथील अंधार लक्ष्मीजवळ त्यांची दुचाकी व मोटारीचा अपघात झाला.
कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी (Appachiwadi Nipani) येथे दुचाकी-मोटार अपघातात अंगणवाडीची शिक्षिका (Anganwadi Teacher) ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. अंजना गोपाळ माळी (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे.