गाय दूध उत्पादकांना अनुदानाची घोषणा हवेतच

गाय दूध उत्पादकांना अनुदानाची घोषणा हवेतच
Published on

गाय दूध उत्पादकांना
अनुदानाची घोषणा हवेतच

अनुदान तातडीने खात्यावर जमा करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २१ : डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात गाय दूध उत्पादकांना लिटरला दोन रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मात्र, घोषणा होऊन सहा महिने उलटले तरी दूध उत्पादकांच्या खात्यावर अद्याप अनुदान जमा झालेले नाही. दूध उत्पादकांचे अनुदानाकडे डोळे लागले असून, अनुदान त्वरित जमा करावे, अशी मागणी उत्पादकांमधून होत आहे.
कॅशलेस व्यवहार करा, अनुदान खात्यावर त्वरित जमा करू, असा आदेश दुग्ध विभागाकडून दूध संस्था सचिव व कर्मचाऱ्यांना तातडीने दिला. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी दूध संस्थेत व जिल्हा बँकेत प्रचंड गर्दीही झाली. कॅशलेस व्यवहाराचा तगादा लावल्याने दूध उत्पादकांना नाहक त्रास झाला. तरीही अद्याप अनुदान मिळाले नसल्याने गाय दूध उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच नेत्यांच्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रचार सभा झाल्या. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या जिल्ह्यातील कोणत्याच लोकप्रतिनिधीने गाय दूध अनुदानाबाबत भाष्य केले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. दूध अनुदानाची घोषणा होऊन सहा महिने उलटले तरी अनुदान मिळालेले नाही. अनुदान अडकले कशात? असा सवाल गाय दूध उत्पादकांमधून विचारला जात आहे. दूध व्यवसाय वाढत्या महागाईने अडचणीत आला आहे. जनावरे सांभाळताना नाकीनऊ येत आहे. शासनाने अनुदान तत्काळ जमा करून दूध उत्पादकांना दिलासा द्यावा.
....
कोट....
अनुदान मिळेल, या उद्देशाने कागदपत्रांची जमवाजमव करून बँकेत खाते काढले; पण सहा महिने उलटले तरी गाय दुधाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही.
दत्तात्रय पाटील, कोनवडे, गाय दूध उत्पादक.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com