esakal | वाळवा पंचायत समितीच्या आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा 
sakal

बोलून बातमी शोधा

Another officer of Valva Panchayat Samiti was hit by a corona

वाळवा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील एक विस्तार अधिकारी आज कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा एकदा हादरले आहे.

वाळवा पंचायत समितीच्या आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : वाळवा पंचायत समितीच्या आणखी एका अधिकाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी इरिगेशन विभागाचे अधिकारी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर हे दुसरे अधिकारी देखील आज पॉझिटिव्ह आले आहेत. 

वाळवा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील एक विस्तार अधिकारी आज कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा एकदा हादरले आहे. याआधी एक अधिकारी पॉझिटिव्ह आले होते. तेव्हा पंचायत समितीची संपूर्ण इमारत सॅनिटाईझ करण्यात आली होती.

हे पण वाचाआता कोरोना चाचणीचा तपशील मिळणार ऑनलाईन 

वाळवा तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांनी पंचायत समितीशी संपर्क कमी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले अधिकारी हे ग्रामपंचायत विभागाशी संबंधित विस्तार अधिकारी असल्याने तो विभाग व काही ग्रामसेवकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ते अधिकारी पॉझिटिव्ह येताच गटविकास अधिकारी आणि काही संबंधित अधिकाऱ्यांनी आपली चाचणी करून घेतली, मात्र त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top