esakal | जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; कामगारांची अँटिजेन टेस्ट आवश्‍यक, अन्यथा कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; कामगारांची अँटिजेन टेस्ट आवश्‍यक, अन्यथा कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; कामगारांची अँटिजेन टेस्ट आवश्‍यक, अन्यथा कारवाई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : औद्योगिक वसाहतीतील कामगारांची अँटिजेन टेस्ट, (antigen test of industril workers) ती पॉझिटिव्ह असेल तर आरटीपीसीआर (RTPCR test compulsory) करणे आवश्‍यक आहे. जर न करता काम सुरू केले तर संबंधितांवर थेट कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा आज जिल्हाधिकारी दौलत देसाई (collector daulat desai) यांनी दिला. जीवनावश्‍यक, निर्यात, बंद न करता येणारे उद्योग आणि वैद्यकीय वगळता इतर कोणतेही उद्योग-व्यवसाय सुरू करू नयेत; अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही अनावश्‍यक उद्योग-व्यवसाय सुरू करू नयेत, असाही इशारा जिल्हाधिकारी देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दुपारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या आहेत. (antigen test compulsory for workers said collector in kolhapur)

औद्योगिक वसाहतीतील कंपन्या सुरू आहेत; मात्र तेथे दक्षता घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कंपनीकडून, उद्योजकांकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी अँटिजेन टेस्ट करून घेणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय त्यांना कामावर घेऊ नये. अँटिजेन पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर करून घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही स्थितीत हे नियम पाळले नाहीत, तर संबंधित उद्योगावर करवाई केली जाणार आहे. यासाठी १३ प्रमुख आणि उपसमित्याही नियुक्त केल्या आहेत. प्रत्येक कंपनीत याची तपासणी होणार आहे. ज्या ठिकाणी टेस्ट न करता कामगार कामावर असतील तेथे थेट कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: पैशापेक्षा माणसं, फॅमिली जपूया! 24 तासांत आम्ही आई-वडिल गमावलेत

सध्या केवळ चार अत्यावश्‍यक बाबींनाच व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. उर्वरित व्यवसाय बंद ठेवले पाहिजेत. यामध्ये जीवनावश्‍यक, निर्यात उद्योग, सुरूच ठेवावे लागणारे उद्योग, वैद्यकीय उद्योगांनाच व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहेत. इतर व्यापाऱ्यांनी-उद्योगांनी ते सुरू ठेवले तर त्यांच्यावरही थेट कारवाईच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

ऑक्सिजन वैद्यकीयसाठीच

जिल्ह्यात ऑक्सिजनचा मुबलक साठा आहे. रुग्ण वाढले तरीही कमी पडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. सध्या औद्योगिक वसाहतीसाठी लागणारे सुमारे ९०० सिलिंडर वैद्यकीयसाठी वापरले जात आहेत. कोणत्याही स्थितीत औद्योगिकसाठी ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार नाही याचीही दक्षता घेण्यास सांगितले आहे. असे कोणीही आढळले तर त्यांच्यावर थेट कारवाई होणार असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा: संधी नोकरीच्या... : फॉरेन्सिक सायन्समधील ‘थरारक’ नोकऱ्या!

लसीकरण करणारच

आरोग्य सेतू ॲपवर सध्या मार्केट यार्ड परिसरात अधिक रुग्ण असल्याचे दिसते. यावर उपाय म्हणून मार्केटमध्ये येणाऱ्यांचीही आता अँटिजेन केली जात असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले. लशीचा पुरवठा कमी होत असल्यामुळे सर्वांना तूर्त लस देणे शक्य होत नाही. लस उपलब्ध होताच देण्याची व्यवस्था यापूर्वीच केल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.