स्थायी सभापतीपदासाठी कवाळे, खाडे यांचे अर्ज 

Application for Kavale, Khade for the post of Permanent Chairman
Application for Kavale, Khade for the post of Permanent Chairman
Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी सत्तारूढ कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून संदीप कवाळे तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून विजयसिंह खाडे-पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

परिवहन समिती सभापतीसाठी सत्तारूढ आघाडीकडून शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे व भाजप- ताराराणी कडून महेश वासुदेव यांनी अर्ज भरले. त्याचबरोबर महिला आणि बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शोभा कवाळे व भाग्यश्री शेटके यांच्यात चुरस होणार आहे. सर्व उमेदवारांनी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. 

महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहनसह महिला आणि बालकल्याण समिती सभापती, उपसभापती निवड 11फेब्रुवारी रोजी होणार आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कडून राष्ट्रवादीच्या संदीप कवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांना शारंगधर देशमुख यांनी सूचक तर अजित राऊत यांनी अनुमोदन दिले. 

भाजप ताराराणी आघाडीकडून विजयसिंह खाडे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पाटील यांना विजय सूर्यवंशी यांनी सूचक तर राजाराम गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्याचबरोबर परिवहन समिती सभापतीसाठी आघाडीकडून शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे तर भाजप ताराराणी कडून महेश वासुदेव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उत्तुरे यांना सूचक संदीप सरनाईक तर चंद्रकांत सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले. वासुदेव यांना सूचक म्हणून शेखर कुसळे तर नामदेव नारखेडे यांनी अनुमोदन दिले. 

त्याचबरोबर महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून शोभा कवाळे आणि भाजप ताराराणी आघाडीकडून भाग्यश्री शेटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर उपसभापती पदासाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडून वहिदा सौदागर आणि भाजप- ताराराणी आघाडी कडून रुपाराणी निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com