राजेंद्र यांचे वडील गोपाळ हे सुद्धा सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. राजेंद्र यांना लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण होते. बारावी उत्तीर्ण होताच त्यांनी भरतीसाठी प्रयत्न केले.
चंदगड : रामपूर (ता. चंदगड) येथील सैन्यदलात कार्यरत असणारे जवान (Army Jawan) राजेंद्र गोपाळ कांबळे (वय ३६) हे दिल्ली येथे लाईनवर काम करत असताना अपघात होऊन जखमी झाले होते. शुक्रवारी (ता. २०) हा अपघात झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (ता. २१) दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले. हे वृत्त समजतात गावावर शोककळा पसरली.