पुरस्कार हा समाजमनाचा आरसा

पुरस्कार हा समाजमनाचा आरसा

Published on

3439
कुडुत्री (ता. राधानगरी) : येथे (कै.) लक्ष्मी चौगले ट्रस्टच्या वतीने पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना साहित्यिक चंद्रकांत पोतदार. शेजारी मारुती मांगोरे, शिवाजी चौगले, मधुकर मुसळे, संतोष पाटील, रामचंद्र चौगले आदी.
.................
पुरस्कार हा समाजमनाचा आरसा

चंद्रकांत पोतदार ः कुडुत्री येथे चौगले ट्रस्टच्या पुरस्कारांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
कसबा तारळे, ता. ७ : ‘पुरस्कार हा समाजमनाचा आरसा असतो. समाजात राहून समाजातील विविध घटकांसाठी काही माणसे डोंगराएवढे कार्य करतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना पुन्हा काम करण्याची नवऊर्जा निर्माण करण्यासाठी पुरस्कार हे योग्य माध्यम ठरते. (कै.) लक्ष्मी श्रीपती चौगले चॅरिटेबल ट्रस्टने अशा गुणवंतांना दिलेले पुरस्कार हे मोठे सामाजिक पाठबळ आहे,’ असे प्रतिपादन साहित्यिक चंद्रकांत पोतदार यांनी केले.
कुडुत्री (ता. राधानगरी) येथे चौगले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लक्ष्मी चौगले यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण व सद्भावना सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बलभीम सेवा संस्थेचे उपाध्यक्ष सखाराम चौगले होते. ट्रस्टचे संस्थापक रामचंद्र चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी ट्रस्टच्या वतीने सुनील माने (काळम्मावाडी), अनिल बडदारे (राधानगरी), रमेश पारकर (कुडुत्री), अभिजित पाटील (गुडाळ), सुंदर जाधव (शेणगाव), विक्रम वागरे (करंजफेण), राजेंद्र पाटील (कौलव), भागवत शेटके (करंजिवणे), मयुरेश शिंदे (राधानगरी), जावेद सय्यद (गारगोटी), पांडुरंग दांडेकर (राधानगरी), उदय पाटील (शिरगाव), वैभव येलेकर (कुडुत्री), युवराज कुंभार (कुंभारवाडी), अपूर्वा एकावडे (डुबलवाडी), संदीप टिपुगडे (आवळी बुद्रुक), सुरेखा कांबळे (कुडुत्री), संदीप गोजारे (सरवडे) आदींना पुरस्कार देऊन गौरविले.
यावेळी विजयसिंह मोरे (सरवडे) व श्रीपती कोंडी पाटील (बुजवडे) यांना जाहीर केलेले मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या नातेवाइकांनी स्वीकारले. कार्यक्रमास कादंबरीकार मारुती मांगोरे, रमेश साबळे, मधुकर मुसळे, सरपंच शिवाजी चौगले, पिरळचे माजी उपसरपंच संतोष पाटील, आदी उपस्थित होते. विश्वास आरडे यानी सूत्रसंचालन केले.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com