

The SIT investigates alleged financial irregularities in land purchases and sheep sales at Sant Balumama Trust in Kolhapur.
esakal
कोल्हापूर : संत बाळूमामा ट्रस्टकडून केलेल्या जमीन खरेदी, मेंढी विक्रीतील ६१ कोटींच्या अपहाराची चौकशी ‘एसआयटी’ मार्फत सुरू आहे. तत्कालीन प्रशासक रागिणी खडके हिच्या कार्यकालात झालेल्या जमीन खरेदी व्यवहारात मनमानी कारभार झाल्याचे समोर येत आहे. सहधर्मादाय आयुक्तांनाही अंधारात ठेऊन स्थानिक पातळीवरील एजंटांच्या मदतीने झालेल्या ११ कोटी ५६ लाखांचे व्यवहार रडारवर आहेत. २०२० ते २०२६ कालावधीतील ट्रस्टच्या गैरव्यवहारांप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास एसआयटीकडून सुरू आहे.