esakal | बेडगात कोरोनाचा विस्फोट: एकाच दिवसात 43 नवे बाधित; गावात भितीचे वातावरण

बोलून बातमी शोधा

बेडगात कोरोनाचा विस्फोट:  एकाच दिवसात 43 नवे बाधित
बेडगात कोरोनाचा विस्फोट: एकाच दिवसात 43 नवे बाधित
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आरग (सांगली) : बेडग ( ता.मिरज ) येथे सध्या कोरोनाचा विस्फोट झाला आहे. शुक्रवारी ( ता.23 ) रोजी गावात एकाच दिवसात तब्बल 43 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चार दिवसातच गावाने शतक आकडा पार केला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची लक्षणीय वाढ चिंताजनक असून गावची वाटचाल हास्पॉट दिशेने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

आज अखेर गावात एकूण 175 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 18 जणांचा होम आयसोलेशन कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. तसेच 157 रुग्ण हे ऍक्‍टिव्ह असून त्यांच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात एक अंकी रुग्ण संख्या असलेल्या बेडग गावात आता झपाट्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. बुधवारी 118 सक्रिय बाधित आढळून आले होते. गुरुवारी 98 जणांनी केलेल्या तपासणीत काल 43 जण बाधित झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून रुग्ण संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना नियंत्रणासाठी आरग प्राथमिक आरोग्य केंद्राकडून उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत. लोकांनी खबरदारी घ्यावी लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी तसेच लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या गावात जनता कर्फ्यु सुरू असून गाव तीस तारखेपर्यंत कडकडीत बंद करण्यात आले आहे.

बेडग गावात रुग्ण संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी एका दिवसात 43 नवे रुग्ण आढळले. बाधित असणाऱ्या रुग्णांच्या वर आरग तसेच बाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनव्दारे उपचार सुरू आहेत.'

डॉ. नितीन चिकुर्डेकर , वैद्यकीय अधिकारी, आरग

Edited By- Archana Banage