

मानसिक आरोग्य
-----------------------
जीवनातील घटनांची तणावजन्यता
डॉ. थॉमस होम आणि त्यांचे सहकारी यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिन’ येथे जीवनातील तणावजन्य परिस्थिती व घटनांची एक यादी तयार केली. या घटकांना तणावजन्यतेनुसार गुणही दिले. हा शोधनिबंध त्यांनी ‘जर्नल ऑफ सायकोसोमॅटिक रिसर्च’मध्ये प्रसिद्ध केला. एक ते दोन वर्षांच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या असतील त्यासमोर खूण करा. कंसात दिलेल्या गुणांवरून त्यांची कमीअधिक तणावजन्यता लक्षात घ्या.
*जोडीदाराचा मृत्यू-पती वा पत्नीचा मृत्यू (१००)*घटस्फोट (७३)* पती किंवा पत्नीपासून विभक्त, कौटुंबिक कारणांनी वेगळे राहाणं (६५)*तुरुंगवास रिमांडहोम इ. (६३)*कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू (६३)*गंभीर स्वरूपाचा आजार, इजा, अपघात, कुटुंबातील व्यक्तीचे आजारपण (५३)*विवाह, वाङनिश्चय, मुलीचे वा अवलंबून असणाऱ्या बहिणीचे लग्न (५०)*अधिकारी वर्गाशी मतभेद, वादविवाद (४७)*कुटुंबातील व्यक्ती, मित्र यांच्याशी दुरावा, भांडण, वादग्रस्तता (४७)*सलोखा-विभक्त पती-पत्नीमध्ये सलोखा (४५)*निवृत्ती (४५)*स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य यांची बेकारी (४५)*कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यात किंवा वागणुकीत बदल (४४)*गर्भारपण (४०)*लैंगिक समस्या (३९)*कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन (३९)*गंभीर स्वरूपाची वैयक्तिक तडजोड-पुनःस्थापना विलिनीकरण, दिवाळखोरी इ.(३९)*आर्थिक स्थितीत महत्वाचा व मोठा बदल, आर्थिक स्थिती कमालीची खालावणे (३८)*जिवलग मित्राचा किंवा मैत्रिणीचा मृत्यू (३६)*लाडक्या पाळीव प्राण्याचा मृत्यू (३६)*कामाच्या स्वरूपात बदल, विस्तार, वाद, प्रमोशन(३६)*पतीपत्नीमधील वादविवादांच्या संख्येत मोठा बदल-नेहमीपेक्षा खूप कमी किंवा अधिक वादविवाद(३६)* दहा लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणे (३१)*मुदतीच्या आधी कर्जफेड (३०)*कामातील नोकरी, व्यवसाय, सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी व अधिकार यामध्ये महत्त्वाचा बदल (२९)*मुलगा-मुलगी घरापासून दुरावणे-लग्न, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, परदेशगमन इत्यादि (२९)*सासू, सासरे, सुनेशी मतभेद, सासुरवास (२९)*अत्यंत लक्षणीय असे वैयक्तिक यश(२८)*पत्नीचे घराबाहेरील काम, उदा. नोकरी व्यवसाय सुरू करणे वा बंद करणे (२६)*शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात किंवा स्थागिती(२६)*जीवनमानामध्ये मोठा व महत्त्वाचा बदल-नवीन घर बांधणे, घर उद्ध्वस्त होणे, घराचे नूतनीकरण इ.(२५)*वैयक्तिक सवयींमध्ये महत्वाचे बदल-शिष्टाचार, पेहराव, मित्रमंडळीतील ऊठबस इ.(२४)*अधिकारी व्यक्तीशी संबंधित समस्या (२३)*कामाच्या वेळेत, परिस्थितीत मोठा व महत्त्वाचा बदल, बदली होणे (२०)*राहण्याच्या ठिकाणात बदल, यात्रा किंवा टूर्सवर असण (२०)*नवीन शाळेत कॉलेजात प्रवेश(२०)*करमणूक, मनोरंजनाची पध्दत, त्यासाठी वेळ यामध्ये बदल(१९)* पूजाअर्चा, योग, देवभक्ती, चर्च, नमाज इ. व त्यासाठीच्या वेळात महत्वाचा बदल (१९)*सामाजिक व सांस्कृतिक सहभागासाठी दिल्या जाणाऱ्या वेळात महत्त्वाचा बदल (१९)* १० लाखांपेक्षा कमी रकमेचे कर्ज किंवा गहाणखत (१७)*झोपण्याच्या सवयीत महत्वाचा बदल नेहमीपेक्षा खूप कमी किंवा जास्त, झोपण्याच्या वेळेत बदल (१६)* खाण्यापिण्याच्या सवयीत मोठा बदल (१५)* मोठी सुटी (१५)*ख्रिसमस, दिवाळीसारखे मोठे सण (१५)*नियमोल्लंघन (११)
एक ते दोन वर्षांच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात यातील ज्या घटना घडल्या असतील त्यांच्या गुणांची बेरीज करा.
०-१४९ गुण*कमी ताण
१५०-१९९ गुण*मध्यम ताण
२००-२९९ गुण*खूप ताण
३०० पेक्षा अधिक गुण*अत्याधिक ताण
एका वर्षाच्या कालावधीत २०० पेक्षा अधिक गुण झाल्यास त्या व्यक्तीच्या आरोग्यावर ताणाचा लक्षणीय असा परिणाम दिसून येतो. मानसिक, शारीरिक व्याधी जडतात.
-डॉ. रमा मराठे,
मनोविकास-मानसोपचार तज्ज्ञ
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.