esakal | Bharat Band - भाजप विरोधी वज्रमूठ कायम; 2024 च्या निवडणुकीत सरकारला गाडण्याचा निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Band - भाजप विरोधी वज्रमूठ कायम

भाजप वगळता सर्वपक्षीय भारत बंदला आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Bharat Band - भाजप विरोधी वज्रमूठ कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील केंद्रातील भाजप सरकारला 2024 च्या निवडणुकीत गाडण्याचा निर्धार आज महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने ऐतिहासिक बिंदू चौकात करण्यात आला. भाजप वगळता सर्वपक्षीय भारत बंदला आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरात रॅली काढून पदाधिकारी बिंदू चौकात आले तर संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांसह अन्य छोट्या-मोठ्या संघटनांनी बिंदू चौकात भाजप विरोधी वज्रमूठ कायम ठेवण्याचा निर्धार केला.

हेही वाचा: "राकेश टिकैत तालिबान्यांच्या पावलावर पाऊल टाकताहेत"

'हम दो, हमारे दो' असे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उद्योगपती अंबानी आणि अदानी यांच्यामुळे शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात काळे कायदे होत आहेत. भविष्यात हेच कायदे सर्वसामान्य शेतकरी कामगारांना त्रासदायक ठरणार आहेत. म्हणूनच तब्बल दहा महिने दिल्लीमध्ये लढा देत असणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सर्वांनी एक मुठ बांधली असल्याचे मत ऐतिहासिक बिंदू चौकात राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप सरकारचा धिक्कार असो, शेतकरी जगला पाहिजे, लोकशाही जगली पाहिजे, शेतकरी वाचवा देश वाचवा, शेतकरी कामगार विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजेत, अशा घोषणांनी बिंदू चौक दणाणून सोडला. पावसाच्या रिमझिम सरींमध्येही शेतकरी, कामगारांनी, नेत्यांनी व्यासपीठ सोडले नाही. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही राजकीय नेत्यांनी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक शैलीत भाषण करून 2024 ला परिवर्तन घडवण्याबाबत एकजूट ठेवण्याचे आवाहन सर्वांना केले.

हेही वाचा: Bharat Band - मोदी सरकारचा धिक्कार!

माजी आमदार आणि निमंत्रक संपत पवार यांनी समारोपाच्या भाषणात उशिरा का होईना शेतकऱ्याची, कामगारांची व्यथा सर्वांना समजली आहे. आज सर्वांनी एकजुटीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्रित आंदोलनाला पाठिंबा दिला. हाच पाठिंबा भविष्यात प्रामाणिकपणे राहूदे, असेही आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केले.

दरम्यान शहरासह जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरातील बाजार समिती आज बंद ठेवण्यात आली तर सुमारे 20 हून अधिक विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे किराणा भुसारीसह केश कर्तनालय सुद्धा बंद होते. मात्र वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही. एसटी बसही इतर वाहतूक शहरासह जिल्ह्यात सुरळीत होती.

हेही वाचा: वाघजाळी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

loading image
go to top