‘शक्तिपीठ महामार्ग भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांवर लादला जात आहे. याप्रश्नी तीव्र आंदोलन करावे लागेल.’
गारगोटी : नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गामुळे (Nagpur-Goa Shaktipeeth Highway) कोणाचा फायदा होणार हे जगजाहीर आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तिपीठ मार्गाला आमचा कायमचा विरोध राहील. प्रसंगी आरपारची लढाई करू, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला. भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी याप्रश्नी बुधवारी येथे आत्मक्लेष आंदोलन केले. शक्तिपीठ महामार्ग विरोधात घोषणा देत हुतात्मा चौक परिसर दणाणून सोडला.