Kolhapur : निम्म्यापेक्षा जास्त बायोमॅट्रिक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर महापालिका

कोल्हापूर : निम्म्यापेक्षा जास्त बायोमॅट्रिक बंद

कोल्हापूर : कोरोनाचा फटका अनेक उद्योग, नागरिकांना बसला तसाच फटका महापालिकेच्या हजेरीच्या बायोमॅट्रिक मशीननाही बसला. विविध कार्यालयांतील ४० पैकी ३० मशीन दोन वर्षांपासून बंद राहिल्याने खराब झाली. नवीन सिस्टिमला पूरक नसल्याचे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणमधून स्पष्ट झाले. आता बायोमॅट्रिक मशीनद्वारे हजेरी नोंदवण्यास सुरुवात केली असल्याने बंद मशीन बदलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध कार्यालयात २०१६ मध्ये नवीन मशीन लावली. त्यामध्ये अंगठा व चेहरा स्कॅन करण्याची सुविधा होती. त्यामुळे अंगठा स्कॅन होत नाही म्हणून तेथील कर्मचाऱ्यांकडून हजेरी नोंदवण्याचे प्रकार कमी झाले. कोरोना सुरू झाल्यानंतर हाताद्वारे संसर्गाचा धोका असल्याने बायोमॅट्रिकवरील हजेरी बंद केली. त्यामुळे ही मशीन धूळखात पडली. त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते.

आता या मशीनवर हजेरी सुरू करण्यास सांगितले असल्याने ती मशीन तपासली. महापालिकेने व नंतर देखभाल करणाऱ्या कंपनीकडून झालेल्या सर्वेक्षणमध्ये ४० पैकी ३० मशीन बंद तसेच नवीन यंत्रणेला पूरक नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नवीन कोटेशन मागवून नवीन मशीन बसवण्याचे तसेच सर्व यंत्रणेच्या देखभालीची जबाबदारी देण्याची प्रक्रिया राबवली. ती आता मंजुरीच्या टप्प्यात आहे. जवळपास तीन लाखांवर याचा खर्च आहे. या प्रक्रियेतून ‘अर्थ’ शोधला जात असून बाजारातील दरापेक्षा महापालिकेत बसवण्यात येणाऱ्या मशीनची किंमत जादा असल्याची चर्चा महापालिकेत आहे.

येथे आहेत मशीन

मुख्य इमारत

विभागीय कार्यालये

दवाखाने व रुग्णालये

सफाई कामगारांची प्रभागातील कार्यालये

बायोमॅट्रिकची वाटचाल...

२०१६ मध्ये - नवीन मशीन बसवली

२०१७ पर्यंत - केंद्रीय भांडारतर्फे देखभाल

२०१७ नंतर - इंटीग्रिटी टेक्नो सोल्युशनकडून देखभाल

२०२० पासून - आजतागायत मशीन बंद

मशीन बंद असण्याचे हे तिसरे वर्ष आहे. त्यामुळे महापालिकेने सर्वेक्षण केल्यानंतर संबंधित कंपनीलाही सर्वेक्षण करण्यास सांगितले. त्यातून ३० मशीन बंद असल्याचे दिसले. त्यासाठी कोटेशन मागवले व त्यात आलेल्या दराप्रमाणे वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

- यशपाल राजपूत,सिस्टिम मॅनेजर, महापालिका

Web Title: Biometric Machine Kolhapur Municipal Attendance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..