'गावांना विश्‍वासात घेतले, तरच हद्दवाढ करता येईल'

'गावांना विश्‍वासात घेतले, तरच हद्दवाढ करता येईल'
Summary

प्राधिकरणाची स्थापना करताना प्राधिकरणातील गावांसाठी ५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. पण, ते दिले नाहीत.

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरण करतो आणि ५०० कोटी रुपये निधी देतो, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार प्राधिकरण झाले; पण ५०० कोटी काही आले नाहीत. प्राधिकरणातील गावांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या गावांना हद्दवाढीत घेताना विश्‍वासात घेतले पाहिजे. तरच हद्दवाढ करता येईल, अशी भूमिका पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज स्पष्ट केली. (kolhapur boarder expand)

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांच्या आढावा मेळाव्यात शहरातील दोन आमदार शहर हद्दवाढीबरोबर नसल्याची टीका कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी हद्दवाढीबद्दल कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

'गावांना विश्‍वासात घेतले, तरच हद्दवाढ करता येईल'
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्यापासून दहावी-बारावीचे वर्ग सुरू

पाटील म्हणाले, की प्राधिकरणाची स्थापना करताना प्राधिकरणातील गावांसाठी ५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. पण, ते दिले नाहीत. त्यामुळे लोकांची फसवणूक झाली आहे. हद्दवाढ करण्याआधी संबंधित गावांना विश्‍वासात घेऊन हा निर्णय घेतला पाहिजे. जी गावे हद्दवाढीत येणार आहेत, त्या गावातील लोकांशी चर्चा करायला हरकत नाही, महापालिकेत आल्यावर त्या गावांना कोणत्या सुविधा काय दिल्या जाणार, घरफाळा, पाणीपट्टी किती वाढेल किंवा इतर कर किती वाढेल, याशिवाय त्याचा फायदा काय होणार हेही समजून सांगितले पाहिजे. ग्रामस्थांची हद्दवाढीसाठी मानसिकता तयार करूनच आपण हद्दवाढ करायला हरकत नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

स्वीकृत संचालकचा मुद्दा राज्यपातळीवरील

३३ वर्षांनंतर गोकुळ (Gokul Kolhapur) सभासदांच्या मालकीचा संघ झाला आहे. दुधाला दोन रुपये जास्त दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर, मुरलीधर जाधव यांना ‘गोकुळ’मध्ये स्वीकृत संचालक म्हणून घेण्याचा मुद्दा राज्यपातळीवरील आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करून यातून तोडगा काढणार आहोत. त्यांचा योग्य सन्मान कसा होईल, याचा विचार केला जाईल. पण, आपणच आपल्या जिल्ह्यातील संस्थेला बदनाम करू नये, अशी विनंतीही पाटील यांनी केली.

'गावांना विश्‍वासात घेतले, तरच हद्दवाढ करता येईल'
पाकमध्ये मंदिरावर हल्ला; जन्माष्टमीलाच कृष्णाची मूर्ती तोडली

शेतकऱ्यांना जास्त मदत देण्याची भूमिका

माजी खासदार राजू शेट्टी (Raju shetti) यांनी आंदोलन केले. पण, आताचे पंचनामे हे ‘एचडीआरएफ’च्या नियमाने सुरू आहेत. या नियमांमध्ये बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले. त्यांना जास्त मदत देण्याची भूमिका सरकारची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, हे निश्‍चितपणे सांगता येईल, असेही श्री. पाटील यांनी नमूद केले. या मोर्चात श्री. शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. शेट्टी महाविकास आघाडी सोडून बाजूला जाणार नाहीत, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

जलसमाधी आंदोलन टाळावे

राजू शेट्टी महाविकास आघाडीपासून लांब जात नाहीत; तर ते लोकांच्या प्रश्‍नासाठी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. आम्हीही तोच प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे शेट्टी यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, कारण अजूनही पंचनामे सुरू आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्राची मूळ आकडेवारी आली पाहिजे. पहिल्यांदा ६२ हजार हेक्‍टरवर होती. आज तोच आकडा ७० हजार हेक्‍टरपर्यंत गेला आहे. त्यामुळे, नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी पंचनाम्याची आकडेवारी आल्यावर सर्वांना नुकसान भरपाई देता येणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी काही वेळ द्यावा आणि जलसमाधी आंदोलन थांबवावे, असेही आवाहन पाटील यांनी केले.

'गावांना विश्‍वासात घेतले, तरच हद्दवाढ करता येईल'
भारतात नवीन रुग्णांच्या संख्येत घट; केरळने वाढवलीय चिंता

पाटील- महाडिक वाद

पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक एकत्र येण्यात काही लोक अडचण निर्माण करतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. याबद्दल पालकमंत्री पाटील म्हणाले, की याबद्दल चंद्रकांत पाटील यांनाच माहीत, आपण त्यावर काहीही भाष्य करू शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com