esakal | लग्नाचा 'गोंधळ' पडला महागात; चक्क नवरदेवाच्या 'टेस्ट'ने गुडाळात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bride

लग्नाचा 'गोंधळ' पडला महागात; चक्क नवरदेवाच्या 'टेस्ट'ने गुडाळात खळबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कसबा तारळे (कोल्हापूर) : मूळचे गुडाळ (ता.राधानगरी) येथील व सध्या कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या दोन सख्ख्या भावांचे लग्न बाहेर गावी झाले.लग्नाचा गोंधळ मात्र मूळ गुडाळ गावी बारा दिवसांपूर्वी प्रथेप्रमाणे झाला. कार्य उरकल्यानंतर काही दिवसांनी एका नवरदेवाची प्रकृती बिघडली. त्याला व त्याच्या मावशीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. लगेचच या दोघांवर कोल्हापुरातील एका इस्पितळात उपचार सुरू झाले.

ही माहिती समजताच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व तालुका आरोग्य विभागाने दखल घेत संबंधित घरासह परिसरातील काही घरांतील रहिवाशांची प्राथमिक तपासणी केली.तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेंद्र शेट्टे यांनीही तातडीने येथे भेट देऊन संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. आता या सर्वांवर आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून आहे. संसर्ग नेमका लग्नकार्यात झाला की गोंधळात झाला हे मात्र समजू शकले नाही.

" लग्न झालेल्या कुटुंबातील बहुतांशी सदस्य कोल्हापूरला स्थायिक असतात.जेव्हा नवरदेव व त्याची येथील मावशी कोरोना संसर्ग बाधीत झाल्याचे समजले तेव्हा लगेच आरोग्य विभागाच्या मदतीने घरोघरी तपासणी मोहीम राबविली.संसर्ग वाढणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत."

- अभिजीत पाटील (माजी सरपंच)

Edited By- Archana Banage