मास्क न घातल्याने वऱ्हाडींना केला रुपये दोन हजार दंड

The bride was fined Rs 2,000 for not wearing a mask
The bride was fined Rs 2,000 for not wearing a mask
Updated on: 

नृसिंहवाडी ः लग्न समारंभात विनामास्क, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी वऱ्हाडी मंडळींकडून कोरोना समितीने दोन हजार दंड वसूल केला. यावेळी कोरोना समिती आणि वऱ्हाडी मंडळींत शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. 
येथील एका कार्यालयात इचलकरंजी येथील एकाचा विवाह समारंभ होता. समारंभात वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाद्यांच्या गजरात प्रमुख मार्गावरून नवरदेवाला घोड्यावरून घेऊन जाताना वऱ्हाडी मंडळींनी तोंडाला मास्क लावलेला न्वहता, तसेच सोशल डिस्टन्सचे पालन न करता गर्दी केली होती. याबाबत ग्रामपंचायत कोरोना समिती आणि पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर कार्यालयात समितीचे अध्यक्ष मधुकर गंवडी, सदस्य सागर धनवडे, ग्रामपंचायत कर्मचारी दीपक मिटके आणि पोलिसांनी सूचना दिल्या. यावेळी वऱ्हाडी मंडळी आणि कोरोना समिती सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर मंगल कार्यालयाच्या मालकाने गर्दी कमी करून मास्क घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश नाही, अशा सूचना दिली. याबाबत विनामास्क, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन हजारांचा दंड वसूल केला.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com