esakal | कॅबिनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू ; राजू शेट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty

कॅबिनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू: राजू शेट्टी

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : पुरात बुडालेली पिकं आणि पीक कर्जाच्या मागणी संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आलेला महापूर, मराठवाड्यामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी संदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली होती. यावेळी शेट्टी यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले,पूर येऊन दीड महिना झाला. मात्र अजूनही शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ ट्विट न करता यावर आता शासन दरबारी घ्यावा. शासनाने जीआर काढून आधीच्या कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे. याचप्रमाणे विनाअट पुनर्वसन झाले पाहिजे. या मागणीचा विचार करून यावर ठोस उपाय केला पाहिजे.

हेही वाचा: दैव बलवत्तर! 8 खलाशी सुखरूप, आंजर्ले खाडीत नौकेला जलसमाधी

शेतकरी आणि पूरग्रस्तासंबंधी मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिल आहे. पुरात बुडालेली पीकं आणि पीक कर्जाच्या मागणी संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. असे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटंल आहे. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा नदीची पायी परिक्रमा पू्र्ण झाली. आता कॅबीनेटच्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या

-पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

- आवश्यकता असलेल्या गावांचे पुनर्वसन व्हावे

- काही गावासाठी तात्पुरत्या छावण्या उभारण्यात याव्यात

- पूरग्रस्त भागातील मुलांची शैक्षणिक फी माफ व्हावी

- पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी भरघोस मदत मिळावी

- पूरग्रस्त भागातील नदीवरील पुलांची उंची तातडीने वाढवावी

loading image
go to top