मेंढीचे दुध नियमित प्या आणि कर्करोगाला दूर करा ; डॉ.अभिनंदन पाटील यांचे संशोधन 

Cancer relief got milk Research by Dr. Abhinandan Patil kolhapur marathi news
Cancer relief got milk Research by Dr. Abhinandan Patil kolhapur marathi news

कोल्हापूर :  मेंढीचे दुध नियमित प्यायल्याने कर्करोग होत नाही, या दुधापासून बनविलेली भुकटीही कर्करोगाला दूर ठेवू शकते, असे संशोधन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात डॉ.अभिनंदन पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या संशोधनाची अमेरिकेतील "एनसीबीआय' या संस्थेने दखल घेतली आहे. या दुधातील कर्करोगास प्रतिकार करणाऱ्या सत्वहीन प्रथिने निर्माण करणाऱ्या सुक्ष्म जीवाणूचा त्यांनी शोध लावला आहे. या दुधातील सुक्ष्म जीवाणूंपासून तयार केलेल्या भुकटीपासून कर्करोगावर परिणामकारक ठरणारी औषधे बाजारात येणार आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे डॉ. पाटील सांगतात. 

 असा होणार उपयोग
या दुधातील सुक्ष्म जीवाणू आतड्यांचे ट्युमर नष्ट होण्यास मदत करतात शिवाय भविष्यात आतड्याचा कर्करोग होण्याची शक्‍यता संपते, असे संशोधनात पुढे आले. याचा पहिला प्रयोग उंदरांवर केला जो यशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी दुधातील सुक्ष्म जीवाणुंपासून तयार केलेल्या औषधांमुळे कर्करोगावर उपचारही होऊ शकतात, असे निष्कर्ष मांडले. या संशोधनासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शिवाजी पवार, डॉ. जॉन डिसुजा,डॉ.सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. 

डॉ. अभिनंदन कोल्हापूरचे. भारती विद्यापीठातून त्यांनी बी. फार्मचे शिक्षण घेतले. वारणानगर येथून एम.फार्म पूर्ण केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात पी.एचडीचे संशोधन सुरू केले. तेथे त्यांनी नॅनो फॉरमोकॉलॉजी म्हणजेच सुक्ष्म जीवाणुंवर पाच वर्षे संशोधन केले. सध्या ते संजय घोडावत विद्यापीठात स्कूल ऑफ फार्मसीमध्ये कार्यरत असून मेंढीच्या दुधातील सुक्ष्म जीवाणूंपासून कर्करोगावरील उपचार पद्धती या विषयावर तेथे संशोधन सुरू आहे.

कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेतील निदान या विषयावर त्यांनी जपान मधील टोकियो विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या या शोधनिंबधातील संशोधनाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. तसेच फार्मसी विभागातील आदर्श विद्यार्थी म्हणूनही त्यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले होते. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा स्टार्ट अप हिरो ऑफ महाराष्ट्र हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. 


आदमापुरातील मेंढ्यांच्या दुधात आढळतात जिवाणू 
विशेष म्हणजे, कर्करोगावर जालीम इलाज करणारे हे दुध केवळ आदमापूर परिसरातील मेंढ्यामध्येच आढळते, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे. डॉ. पाटील यांनी 2016 - 17 साली आदमापूर परिसरातील मेंढ्याच्या दुधाचा अभ्यास सुरू केला. दुधाचे सॅम्पल घेऊन त्यातील सुक्ष्म जीवाणूंचा जनुकीय पद्धतीने संशोधन केले. तसेच हे दुध नेहमी पिणाऱ्या व्यक्तींचाही अभ्यास सातत्याने सुरू ठेवला.  

संपादन- अर्चना बनगे


 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com