नायजेरियन फ्रॉडचा विळखा

प्राध्यापक, डॉक्टर, व्यावसायिक गळाला; चॅटिंगद्वारे आमिष
fraud crime
fraud crimeesakal

कोल्हापूर : वाढदिवसाचे गिफ्ट पाठविले आहे, टॅक्स भरून सोडवून घ्या, असे सांगून फसवणूक झाली आहे. विशेष करून ‘नायजेरियन फ्रॉड’ म्हणून याला ओळखले जाते. सोशल मीडियावर तुम्ही विदेशातील व्यक्तीशी मैत्री करता, असे भासविले जाते. प्रत्यक्षात ती व्यक्ती विदेशातील नसते, असा अनुभव आहे.

उदाहरण एक : फेसबुकवरून एका प्राध्यापिकेची दुबईतील व्यक्तीशी ओळख झाली. मैत्री वाढली. त्याने वाढदिवसासाठी ‘गोल्ड ज्वेलरी’ पाठविल्याचे सांगितले. चार दिवसांनी विमानतळावरून फोन आला. तुमचे दुबईवरून आलेले पार्सल सोडविण्यासाठी टॅक्स भरा. त्या प्राध्यापिकेने ४० लाखांहून अधिक रक्कम वेगवेगळ्या बॅंक अकाउंटवर पाठविली. नंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पुढे तपास झाला. दुबईतील ती व्यक्ती प्रत्यक्षात तेथील नव्हती. हा ‘नायजेरियन फ्रॉड’ होता. ‘तुम्ही दुबईला या विमानाचे तिकीट पाठवितो’, असे सांगून तुम्ही भारतीय करन्सीनुसार कोटींचे सोन्याचे दागिने पाठविल्याची बतावणी करून फसवणूक झाली होती.

(‘फेसबुक’वरील अनोळखी व्यक्तीशी केलेल्या मैत्रीचा हा परिणाम आहे. याचा गुन्हाही नोंद झाला आहे.)

उदाहरण दोन : एका तालुक्याच्या ठिकाणच्या व्यक्तीचे फेसबुकवरील प्रोफाईल पाहून एका महिलेने तेल विक्रीची ऑफर दिली. औषधासाठी तेल लागते. पाठवून द्या, तुम्हाला लिटरला दीड लाख कमिशन देते. ती परदेशात असल्याचेही सांगितले. तेल कोणाकडून घ्यायचे, यासाठी संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक महिलेने दिला. व्यावसायिकाने त्या क्रमांकावर संपर्क साधून लाख रुपये देऊन तेल खरेदी केले. महिलेने सांगितल्याप्रमाणे त्याने मुंबई विमानतळाजवळील ठिकाणी त्या तेलाचे सॅम्पल (१०० एमएल) एका व्यक्तीला दिले.

दुसऱ्या दिवशी तेल योग्य असून २०० लिटर पाहिजे आहे, असे सांगितले. त्यानंतर व्यावसायिकाने संबंधिताला मोबाईलवर संपर्क साधला. त्याने करंट अकाउंट (बॅंकेचे चालू खाते), नोंदणी व सर्व माहिती दिल्यामुळे व्यावसायिकाचा विश्‍वास बसला. मात्र, ॲडव्हान्स म्हणून २० टक्के रक्कम द्या, असे सांगितले. आणखी ३० टक्के ॲडव्हान्स मागितले. ७० टक्के पर्यंत रक्कम व्यावसायिकाकडून घेतली. ही रक्‍कम सव्वा कोटीपर्यंत पोचली. कालांतराने व्यावसायिकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

(फेसबुक प्रोफाईल लॉक न केल्यामुळे तो व्यावसयिक आहे, हे कळाले. त्याला त्याच विषयानुरूप हेरले. पुढे त्याचे आर्थिक नुकसान झालेच, पण मनःस्ताप झाला.)

ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

संजय पवार यांची सायबर फसवणूक थांबली

कोल्हापूर - प्रिय ग्राहक, तुमच्या सिमकार्डची केवायसी संपली आहे. २४ तासांत सिमकार्ड ब्लॉक केले जाईल. तातडीने कस्टमर केअरशी संपर्क साधा. पुढे दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि थॅक्यू... शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मोबाइल स्क्रिनवर हा एसएमएस धडकला. ‘सकाळ’मधील सायबर क्राइमची बातमी त्यांनी वाचली होती. त्यांनी काळजी घेतली आणि फसवणूक टळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com