esakal | कृष्णा काठावरील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कृष्णा काठावरील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांजरी : गेल्या महिन्यात कृष्णा नदीला आलेल्या महापूर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कृष्णा काठावरील मांजरी, अंकली, शिरगुप्पी, कागवाड, उगार, कुडची परिसरात सोमवारी (ता. 6) केंद्रीय पथकाने पाहणी केली. या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पंधरा दिवसात सादर होणार असल्याची माहिती केंद्रीय पथकाचे नेतृत्व करणारे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक डॉ. के. मनोहरन यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय विद्युत खात्याचे संचालक शुभम गर्ग, कर्नाटक राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे आयुक्त मनोज आर्या, बेळगाव जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

कृष्णा नदी काठावरील महापुराने उध्वस्त झालेल्या ऊस पिकाच्या पाहणीसह पाणी योजनेची पाहणी पथकाने केली. केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निर्वाह, राज्य आपत्ती निर्वाह योजनेनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले असले तरी केंद्र, राज्य शासनाकडून दिल्या जाणार्‍या तुटपुंजा नुकसानभरपाईमुळे शेतकर्‍यांना काहीच मिळत नाही.

हेही वाचा: राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांमध्ये एक तृतीयांश घट; 16 टक्के गंभीर रुग्ण

त्यासाठी केंद्र शासनाने नुकसान भरपाईच्या दुप्पट व नगदी पिकाच्या उत्पन्नाबरोबर भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन कृष्णा काठावरील मांजरी, चंदूर, इंगळी, कल्लोळ येथील नागरिकांनी केंद्रीय पथकाच्या पाहणी करणाऱ्या नेतृत्वाला देण्यात आली. यावेळी त्यांच्या चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी युकेश कुमार, चिक्कोडीचे तहसीलदार प्रवीण जैन, बेळगावचे उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लिंगनवार, पोलिस अधिकारी अमरनाथ रेड्डी यांच्यासह चिक्कोडी येथील सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विभागीय अधिकारी उपस्थित होते

loading image
go to top