'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन् निवडणुकीला सामोरं जावं'

'अजित पवार इंधनाच्या करातून मिळणारा आयता पैसा सोडायला तयार नाहीत.'
kolhapur
kolhapuresakal
Updated on: 
Summary

'अजित पवार इंधनाच्या करातून मिळणारा आयता पैसा सोडायला तयार नाहीत.'

कोल्हापूर : सरकारमधील एका मंत्र्याला भ्रष्टाचारावरून अटक झाली. एका मंत्र्याच्या नातेवाईकांकडे १२०० कोटीची मालमत्ता मिळाली. अमली पदार्थांच्या बाबतीत एका मंत्र्याच्या नातेवाईकावर कारवाई झाली. तर एका मंत्र्याच्या जावयाचे १५०० कोटीचे कंत्राट रद्द झाले. आतातरी मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून आपला राजीनामा दिला देऊन मध्यावधी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

kolhapur
'आम्ही नाही ती अंडी उबविली'; मुख्यमंत्र्यांची 'भाजप'ला टोलेबाजी

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सर्व कायदेशीर पर्याय संपल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तपास यंत्रणांना सामोरे जावे लागले. मध्यरात्री त्यांना अटक झाली. आता असा कोणताही गुन्हा उरला नाही ज्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर नाही. राजकारणातील नैतिकता महाविकास आघाडीने धुळीस मिळवली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आहे. या सर्व गोष्टी पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा देऊन मध्यावधी निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. राज्याने आपले कर कमी केले तर पेट्रोल, डिझेल दर कमी होईल. पण अजित पवार इंधनाच्या करातून मिळणारा आयता पैसा सोडायला तयार नाहीत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com