esakal | 'संभाजीराजेंनी आंदोलनात चालढकल करू नये'
sakal

बोलून बातमी शोधा

'संभाजीराजेंनी आंदोलनात चालढकल करू नये'

'संभाजीराजेंनी आंदोलनात चालढकल करू नये'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांच्या मराठा आरक्षण (maratha reservation) आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. मात्र त्यांनी आंदोलनात चालढकल केली तर ते सरकारला वाचवण्यासाठी वेळ देत आहेत, असे वाटते. त्यांची चालढकल समजण्यास मराठा समाज सुज्ञ आहे. त्यांनी आंदोलनाचा उद्देश, रुपरेशा आणि परिणाम हे मराठा समाजासमोर मांडावे. असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी संभाजाराजेंना काढला. धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या कोविड सेंटरच्या (covid center) उद्घाटन समारंभावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

मराठा आरक्षण आणि संभाजीराजे यांची भूमिका याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो आंदोलन करेल त्याला आमचा पाठिंबा असेल. संभाजीमहाजारांचे नेतृत्व पुढे आले. त्यांना आमचा पाठिंबा आहे. ज्या दिवशी रायगडवरून संभाजीराजेंनी मोर्चाची (protest for reservation) घोषणा केली, त्याचा दुसऱ्या मिनिटाला मी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या आंदोलनात कोणताही बॅनर न घेता उभे राहतील असे सांगितले. आता ते म्हणत असतील की मी मोर्चाचे कधी म्हणालो होतो? तर तो त्यांचा प्रश्न. म्हणून आम्ही मोर्चा काढणार नाही. पण कोल्हापुरातून मोर्चासाठी कोणी पुढे येणार असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

हेही वाचा: वन्यप्राण्यांच्या भीतीने 712 हेक्टर जमीन पडीक

संभाजीराजेंनी हे ध्यानत ठेवले पाहीजे की, चालढकल केली तर ती लक्षात यावी एवढा मराठा समाज सुज्ञ आहे. आणि त्यानंतर नवीन नेतृत्व होईल की नाही माहित नाही. पण मराठा समाजाचे नुकसान होईल, निराशा होईल आणि सरकारला वाचण्यासाठी मदत होईल. संभाजीराजे म्हणाले होते, की सोळा तारखेला मोर्चा काढणार. आता म्हणत आहेत, मोर्चा काढणार नाही तर आमदार आणि खासदारांना जाब विचारणार. मग म्हणाले, मुक मोर्चा काढणार. मग म्हणतात पुणे ते मुंबई लाँगमार्च काढणार. नेमके काय करणार आहात? त्यातून काय साध्य होणार आहे? हे मराठा समाजाला नीट सांगितले पाहीजे.

कोविडच्या उपाययोजनांबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एक लाख मृत्यू आपण क्रॉस केले. देशातील एकूण मृत्यूच्या ३३ टक्के मृत्यू राज्यात झाले. त्यामुळे पाठ थोपटवून घेताना ही दुरावस्था का झाली याचा विचारही केला पाहीजे. ११ हजार मृत्यू का लपवले याची माहिती जनतेला दिली पाहीजे. राज्य सरकारने कोविडकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कोविडसाठी राज्य सरकारने जे केले त्याची श्वेतपत्रिका काढावी.‘ अशी मागणी चंद्रकांती पाटील यांनी केली.

हेही वाचा: PHOTO - जाणून घ्या; मेथीची पाने खाण्याचे फायदे

वारकऱ्यांना परवानगी द्या

एकत्रीत चालणे, राहणे हा धार्मिक विचार वारी मागे आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करून वारीला परवानगी दिली पाहीजे. पण सरकार बाकी सगळ्या गोष्टींना परवानगी देते, वारीला देत नाही. असे चंद्रकात पाटील म्हणाले.