कोल्हापूर विमानतळाचे 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असं नामकरण करा : संभाजीराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर विमानतळाचे नामकरण करा; संभाजीराजेंची मागणी

कोल्हापूर विमानतळाचे नामकरण करा; संभाजीराजेंची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाचे (Kolhapur Airport) 'छत्रपती राजाराम महाराज (Chhatrapati Rajaram Maharaj Airport) विमानतळ' असे नामकरण करावे, अशी मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) यांनी नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली. (Chhatrapati-Rajaram-Maharaj-Airport-naming-Demand-for-SambhajiRaje-Chhatrapati-Jyotiraditya-Shinde-akb84)

यावेळी केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांचे संभाजीराजे यांनी अभिनंदन केले. तसेच छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेल्या कोल्हापूर विमानळास महाराजांचे नाव देण्याची मागणी केली.

२०१८ ला राज्य शासनाने तसा ठराव करून प्रस्ताव दिला होता. मात्र, विद्यमान राज्य शासनाने पुन्हा एकदा तसा ठराव करून नव्याने प्रस्ताव पाठविल्यास लवकरच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर,विमानतळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विमानतळाच्या विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. विमानतळावर नाईट लँडिगची सुविधा सुरू करण्यात येणारे अडथळे जलद दूर करावेत, अशी मागणी केली. याबाबत डायरेक्टर जनरल अॉफ सिव्हील एविएशन, भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ प्रशासन, कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख यांच्यासोबत बैठक घ्यावी, अशी मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच, अशी बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावू, असे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले.