मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांचा एनएमएमएस परीक्षा देण्याचा कल दरवर्षी वाढत आहे.
कोल्हापूर : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी (Chhatrapati Rajaram Maharaj Sarthi Scholarship Scheme) पात्र विद्यार्थ्यांच्या आकड्यात दरवर्षी वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. यंदा योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना (Students) तब्बल ७० कोटी ८ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वितरण केले जाणार आहे. राज्यातील दोन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांतील शिष्यवृत्तीचा हा आकडा आहे.