
कोल्हापूर - प्रत्येक गोष्ट महापालिकेनेच करावी, ही मानसिकता बदलून लोकांचा सहभाग असेल तर एखादी मोहीम यशस्वी होते, हे झाडे लावणे आणि स्वच्छता अभियानावरून स्पष्ट झाले आहे. लोक प्रतिसाद द्यायला तयार आहेत, महापालिकेने कामाची निश्चिती करून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यास प्रश्नही सुटू शकतील. लोकसहभागातून विविध कामे मार्गी लागायची झाल्यास किमान पाच कोटींची तरतूद व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
बदलते हवामान, ग्लोबल वॉर्मिंगचे चटके या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी वृक्षप्रेमी नागरिकांनी स्वतःहून झाडे लावण्यास सुरवात केली. लोक स्वतःहून झाडे लावणे, ती जोपासणे आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात. काही स्वयंसेवी संस्था या कामी पुढे येत आहेत. पूर्वी स्वच्छता आणि झाडांना पाणी घालणे, हे महापालिकेचे काम असा समज होता. उद्यान विभागाकडील सध्या जे उपलब्ध आहे, ते पूर्ण क्षमतेने सक्षम नाही, अशा स्थितीत लोकांनीच उद्याने विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावावर १५ दिवसांतून एकदा स्वच्छता मोहीम होते. पंचगंगा स्मशानभूमीत राजस्थानी जैन समाजाने केस कापण्यासाठी पत्र्याची शेडची व्यवस्था
केली आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. सहा महिन्यांपासून दर रविवारी होणाऱ्या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांपासून ते विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते होतात. आयुक्तांनी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना उद्यान दत्तक दिले.
सार्वजनिक रस्त्यांवरील स्वच्छतेसाठी महापालिकेची यंत्रणा तैनात आहे. दारोदारी घंटागाडी येत असल्याने कचरा कोंडाळ्यात जात नाही. टिपरमध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्र करून तो झूमवर नेला जातो. आयलॅन्डव्दारे चौकाचे सुशोभीकरण शक्य आहेत. महापालिकेने त्या त्या भागातील लोकांना आवाहन केल्यास ते वर्गणी काढून चौक सुशोभित
करू शकतात.
महापालिकेने स्वयंसेवी संस्था अथवा सामाजिक संस्थांना सार्वजनिक काम दिल्यास ते करण्याची तयारी असते. रंकाळा परिसर, शाहू स्मृती उद्यान, तसेच लगतच्या परिसरात सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांनी स्वतःहून योगदान दिले आहे. झाडांना पाणी घालण्यासाठी बाटल्या ठेवल्या आहेत. लोकसहभागातून परिसर कसा स्वच्छ ठेवता येतो, हे दाखवून दिले आहे.
-राजू कोगनोळीकर
उद्यानांचा जसा विकास झाला, त्याच धर्तीवर प्रमुख चौकांचे सुशोभीकरण आणि त्यावर रोषणाई झाल्यास पर्यटकांनाही कोल्हापूरला भेट दिल्याचा आनंद मिळेल. सुशोभीकरणासाठी महापालिकेने आर्थिक तरतूद करावी, ही जबाबदारी ज्या भागात चौक आहे, तेथील लोकांवर सोपवावी.
- संजय निकम
आपल्या अपेक्षा व्यक्त करा
या व्हॉट्सॲप क्रमांकावर
९८२२९०७०४६ - डॅनियल काळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.