चित्रदुर्ग घटनेमुळे गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आंतरराज्य बस वाहतूक बंद आहे. आजही या मार्गावर बस सोडण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोल्हापूर : ‘कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आंतरराज्य बससेवा (Karnataka Maharashtra Interstate Bus Service) पूर्ववत सुरू करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली. यामध्ये बससेवा सुरू करण्यापूर्वी आदर्श आचारसंहिता निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन परिस्थिती नियंत्रणात असल्यास बस वाहतूक सुरू केली जाईल. पुढील दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय केला जाईल,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी दिली.