टास्क फोर्सच्या प्रोटोकॉल नुसार कोविड रुग्णांवर उपचार करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Collector Daulat Desai as Devasthan committee Administrator kolhapur latest news marathi
Collector Daulat Desai as Devasthan committee Administrator kolhapur latest news marathi

कोल्हापूर: कोरोनाच्या उपचारासाठी राज्यशासनाने स्थापन कोवीड महाराष्ट्र टास्क फोर्स (Maharastra task force)स्थापन करण्यात आली आहे. या टास्क फोर्सने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जो काही प्रोटोकॉल तयार केला आहे, त्यानुसारच उपचार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई (Collector daulat desai) यांनी केले आहेत. (collector-daulat-desai-appeal-covid-patients-treatment-as-per-task-force-protocol-kolhapur-news)

जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी रुग्णांलय, समर्पित कोवीड सेंटर, समर्पित कोवीड हेल्थसेंटर, कोवीड काळजी केंद्र येथे कोविड टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देसाई यांनी केले. सर्व वैदयकीय अधिकारी, विशेषज्ञ, वैदयकीय अधिक्षक, समुदाय अधिकारी यांनी सदर प्रोटोकॉल नुसार उपचार करावेत, अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावेळी देण्यात आल्या.

वरील मागदर्शक सूचना नुसार कोवीड-19 रुग्णांचे वर्गीकरण पांच गटात करण्यात आले आहे. त्यामध्ये लक्षणे नसलेले रुग्ण, कमी, मध्यम व अती तीव्र आणि चिंताजनक यांचा समावेश आहे. या रुग्णमध्ये आढळणारी चिन्हे ,लक्षणे यानुसार तत्काळ वर्गीकरण करुन सविस्तर उपचार प्रणाली ठरविण्यासाठी या प्रोटोकॉलचा डॉक्टरांना निश्चित फायदा होणार असल्याचे श्री. देसाई यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोना रुग्णांना रेमडेसिविर, टोसिलिझुमाब, आयटोलिझुमाब, फॅविपिरविर इत्यादी महात्वाची औषधे वापर करताना काय खबरदारी घ्यावी, याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. जसे कोणती लक्षणे असल्यास इंजेक्शनचा वापर करावा, डोस मात्रा, दुष्यपरिणाम, रुग्णांवर देखरुख इत्यांदी बाबत तज्ञ समिती गटाव्दारे सविस्तर मागदर्शन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हयातील कोवीड-19 मुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वैदयकीय अधिकारी यांनी प्रोटोकॉलचा वापर करुन त्यानुसारच उपचार करण्यात यावेत. तसेच सदरचे प्रोटोकॉल आपल्या रुग्णांलयातील आय.सी.यु. वार्ड, नर्सिग स्टेशन, जनरल वार्ड इत्यांदी ठिकाणी दर्शनी भागात लावण्यात यावेत असे अवाहन ,जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उषादेवी कुंभार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com