सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी घेतले पैसे; पोलिसांत तक्रार

सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप पुण्यातील एका कर्मचाऱ्यानं केला आहे.
सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी घेतले पैसे; पोलिसांत तक्रार
Summary

सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप पुण्यातील एका कर्मचाऱ्यानं केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायलायने आणखी एक धक्का दिला आहे. गिरगाव कोर्टाने आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांची विनंती मान्य करत कोर्टाने सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप पुण्यातील एका कर्मचाऱ्यानं केला आहे. यासंदर्भात ऑडिओ क्लिपसुद्धा समोर आली होती. दरम्यान, कोल्हापुरात सदावर्तेंविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी घेतले पैसे; पोलिसांत तक्रार
Kolhapur Assembly By Election : चंद्रकांतदादा, मालोजीराजेंची गळाभेट; कार्यकर्त्यांत घोषणाबाजी

अॅड. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी बेकायदेशीररित्या पैसा गोळा केला, असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांनी जमा केलेल्या पैशाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. कोल्हापुरातील दिलीप पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. न्यायाधीश रणजित मोरे यांचा अवनाम होईल अशी वक्तव्य केल्याचा उल्लेखही या तक्रारीत असल्याचं समोर आलं आहे. आत या नव्या प्रकारामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर पुन्हा गिरगाव कोर्टात सुनावणी पार पडली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांची आणखी चौकशी करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी केला आहे. मराठा आरक्षणा संदर्भात न्यायालयीन लढाई सुरु असताना सदावर्ते यांनी मराठा समाजा व्यतिरिक्त इतरांकडून पैसे गोळा केले असा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी घेतले पैसे; पोलिसांत तक्रार
..तर सोमय्यांसोबत भाजपही देशद्रोही, कॉंग्रेसची चौकशीची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com