आमदार झाल्यासारखं वाटतंय.. मतमोजणीला सुरुवात होताच जाधवांच्या अभिनंदनाचे बॅनर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीमती जयश्री जाधव
आमदार झाल्यासारखं वाटतंय.. मतमोजणीला सुरुवात होताच जाधवांच्या अभिनंदनाचे बॅनर

आमदार झाल्यासारखं वाटतंय.. मतमोजणीला सुरुवात होताच जाधवांच्या अभिनंदनाचे बॅनर

कोल्हापूर: राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव या आघाडीवर असून मतमोजणी सुरू असताना श्रीमती जाधव यांचे अभिनंदन करणारे फलक कसबा बावडा परिसरात झळकले आहेत.

कसबा बावडा हा पालकमंत्री सतेज पाटील यांचा बालेकिल्ला आहे, या भागातूनच श्रीमती जाधव यांनी पहिल्या फेरीपासून मतांची आघाडी घेतली आहे. या भागातून एकूण २२ हजार मतदान झाले होते, यापैकी श्रीमती जाधव यांनी १५ हजारांपेक्षा जास्त मते घेतली आहेत. अजून १९ फेऱ्यांची मतमोजणी व्हायची असतानाच बावड्यात मात्र श्रीमती जाधव यांच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत.

आजपासून बावड्याची जत्रा सुरू झाली आहे. या यात्रेसाठी येणार्या भाविकांचे स्वागत करण्यासाठी उभारलेल्या फलकावरच श्रीमती जाधव यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा मजकूर आहे. या फलकावर पालकमंत्री पाटील, त्यांचे बंधू डॉ. संजय डी. पाटील, पुतणे आमदार ऋतुराज यांच्यासह दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचा फोटो आहे

Web Title: Congratulating Banners Of Jayashree Jadhav Published In Kolhapur Uttar Assembly Election Result 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top