काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेशी दुजाभाव

congress-shivsena-ncp logo
congress-shivsena-ncp logoesakal
Summary

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर येथे पहिल्यांदाच अशा पद्धतीची व्यापक बैठक झाली.

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात (kolhapur district) काँग्रेस-राष्ट्रवादीचे (congress-ncp) नेते शिवसेनेशी दुजाभाव करत असल्याची तक्रार शिवसेनेच्या (shivsena) प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. पालकमंत्री शासकीय नियुक्त्या देताना विश्‍वासात घेत नाहीत, तसेच आरोग्य राज्यमंत्री शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले असूनही राष्ट्रवादीचेच काम अधिक करतात. ग्रामविकास मंत्री ग्रामविकास (hasan mushrif) खात्याचा निधी देताना आपल्याच तालुक्याला अधिक प्राधान्य देतात, असाही तक्रारीचा सूर यावेळी व्यक्त झाला.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या आढावा बैठकीत शिवसेना संपर्क नेते दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर आदी उपस्थित होते. तब्बल पाच तास झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.

congress-shivsena-ncp logo
कोल्हापुरात पुनर्वसनासाठी आजपासून तालुकानिहाय बैठका

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर येथे पहिल्यांदाच अशा पद्धतीची व्यापक बैठक झाली. शासकीय नियुक्त्‍या या शिवसेनेच्या संपर्कमंत्र्यांशी बोलून करायला हव्यात. मात्र, पालकमंत्री आपल्याच लोकांना अधिक पसंती देतात, अशी तक्रार राजेश क्षीरसागर यांनी केल्याचे समजते. आरोग्य राज्यमंत्री शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले. ते पक्षाचे काम करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचेच अधिक काम करतात, अशी जाहीर तक्रार यावेळी व्यक्त झाली. ग्रामविकास खात्याच्या निधी वापराबाबतही एकसूत्रता हवी होती; मात्र, येथेही शिवसेनेच्या पदाधिकारी, सदस्यांबाबत दुजाभाव केला जातो.

निधी वाटपाचा जो काही फार्म्युला ठरला आहे, तो पाळला जात नाही, अशाही तक्रारी यावेळी झाल्याचे समजते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीने निधी वाटबाबाबत न्याय मिळणे गरजेचे असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. जिल्हा दूध (गोकुळ) संघावर मुरलीधर जाधव यांची नियुक्ती झाली असली, तरी त्यांना अद्याप सामावून घेण्यात आले नाही, असाही मुद्दा यावेळी मांडण्यात आला. शिवसंपर्क अभियानाचा रावते यांनी आढावा घेतला. संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केली.

congress-shivsena-ncp logo
पडळकरांची बैलगाडा शर्यत झालीच; रात्रीत बदलला ट्रॅक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com